‘नवरात्र’ बंदोबस्तात धक्काधक्की! स्पीकर बंद करायला सांगितल्याने तरुणाचा पोलिसावर हल्ला
भोसरी एमआयडीसी परिसरात मध्यरात्रीची घटना; आरोपीकडून पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ, कॉलर पकडून तोंडावर मारहाण, दात पडले.
पिंपरी-चिंचवड, पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी स्पीकर बंद करण्यास सांगितल्याने संतापलेल्या एका तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला केल्याची गंभीर घटना भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचे दोन दात पडले आहेत.
काय घडले नेमके?
भोसरी एमआयडीसी येथील महात्मा फुलेनगर परिसरातील डॉ. आंबेडकर कमानीजवळ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री च्या सुमारास ही घटना घडली.
नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त सुरू असताना, महात्मा फुलेनगर मंडळाचे स्पीकर मोठ्या आवाजात सुरू होते. पोलीस उपनिरीक्षक श्री. निलेश तळकर यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्पीकर बंद करायला सांगितले. याच दरम्यान, सोहेल कादिरशेख (वय , रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) या आरोपीने स्पीकर मोठ्याने चालूच ठेवला.
यावर फिर्यादी पोलीस कर्मचारी मयूर तुकाराम पाटील (, धंदा नोकरी, रा. दिघी, पुणे) यांनी त्याला स्पीकर बंद करण्यास सांगितले असता, आरोपी सोहेल कादिरशेख याने संतापून पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली.
कॉलर पकडून गंभीर मारहाण
शिवीगाळ केल्यानंतर आरोपी सोहेलने पोलीस कर्मचाऱ्याचे शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर, त्याने फिर्यादीच्या तोंडावर जोराचा ठोसा मारला, ज्यामुळे त्यांचे खालचे दोन दात पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.
याप्रकरणी, भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. नुसार भारतीय न्याय संहिता कलम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सह प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सोहेल कादिरशेख याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
