news
Home पिंपरी चिंचवड जागतिक पातळीवर नेतृत्वाच्या संधी! IIMS आणि MAHRP मध्ये MoU; विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे दरवाजे खुले

जागतिक पातळीवर नेतृत्वाच्या संधी! IIMS आणि MAHRP मध्ये MoU; विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे दरवाजे खुले

संघटनात्मक यशासाठी प्रभावी मनुष्यबळ नेतृत्व आवश्यक; मॉरिशस येथील ला सेंटिनेल ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरिफ सलारू यांचे मार्गदर्शन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मनुष्यबळ व्यवस्थापकांची भूमिका औद्योगिक विकासप्रक्रियेत महत्त्वाची – आरिफ सलारू

 


 

आयआयएमएस (IIMS) आणि मॉरिशसच्या मनुष्यबळ व्यवस्थापक संघटनेत सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना जागतिक अनुभव देण्याचा उद्देश.

 

पिंपरी, प्रतिनिधी बालाजी नवले ,दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

औद्योगिक विकासप्रक्रियेत मनुष्यबळ व्यवस्थापकांची (HR Managers) भूमिका महत्त्वाची असून, बदल आणि धोरणात्मक प्रक्रियेत त्यांचा सहभाग मोलाचा असतो, असे मत मॉरिशस येथील ला सेंटिनेल ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मॉरिशसच्या मनुष्यबळ व्यवस्थापक संघटनेचे (MAHRP) अध्यक्ष आरिफ सलारू यांनी व्यक्त केले.

ते यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (IIMS) येथील एमबीए विद्याशाखेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.

 

संघटनात्मक यशासाठी प्रभावी मनुष्यबळ नेतृत्व आवश्यक

 

आरिफ सलारू यांनी यावेळी बोलताना सांगितले की, संघटनात्मक यशासाठी मनुष्यबळ व्यवस्थापकाचे नेतृत्व परिणामकारक ठरते. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून प्राध्यापक डेव्ह उलरिच यांचे एचआर प्रारूप (HR Model) अभ्यासण्याचा सल्ला दिला. या संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन केले.

आयआयएमएस आणि एमएएचआरपीमध्ये सामंजस्य करार

 

याप्रसंगी IIMS आणि मॉरिशसची मनुष्यबळ व्यवस्थापक संघटना (MAHRP) यांच्यात एक महत्त्वाचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

या करारावर एमएएचआरपीचे अध्यक्ष आरिफ सलारू आणि यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली.

आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील उद्योजकीय घडामोडी आणि अर्थकारणावर होणारा परिणाम थेट समजून घेता यावा, यासाठी या संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले.

या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना जागतिक अनुभव, धोरणात्मक अंतर्दृष्टी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी भविष्यात संधी उपलब्ध होतील, असेही डॉ. मुंढे म्हणाले.

हा सामंजस्य करार यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या IIMS ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!