news
Home पिंपरी चिंचवड PCMC च्या ‘इनचार्ज’ आयुक्तपदी पुन्हा श्रावण हर्डीकर; धडाकेबाज शेखर सिंह कुंभमेळा आयुक्तपदी

PCMC च्या ‘इनचार्ज’ आयुक्तपदी पुन्हा श्रावण हर्डीकर; धडाकेबाज शेखर सिंह कुंभमेळा आयुक्तपदी

पुणे-पिंपरीच्या मेट्रो प्रकल्पातील यशस्वी कामामुळे हर्डीकर यांच्याकडे पुन्हा महापालिकेची धुरा; IAS सिंह यांच्या प्रभावी कामाची शासनाकडून दखल. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

PCMC आयुक्त शेखर सिंह यांची कुंभमेळा आयुक्तपदी बदली: पिंपरी चिंचवड शहरच्या विकासाचे फळ!

 

महापालिकेच्या ‘इनचार्ज’ आयुक्तपदी पुन्हा श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती; नाशिक येथील जगातील सर्वात मोठ्या कुंभमेळ्याची विशेष जबाबदारी IAS सिंह यांच्याकडे.

 

पिंपरी,  प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ०७ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त श्री. शेखर सिंह, भाप्रसे यांची आज (दि. ०७ ऑक्टोबर २०२५) बदली झाली असून, त्यांची नियुक्ती आयुक्त, कुंभमेळा, नाशिक या अत्यंत महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे.

 

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, श्री. शेखर सिंह यांनी तातडीने आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा.

शेखर सिंह यांना जगातील सर्वात मोठ्या कुंभमेळ्याची जबाबदारी

श्री. शेखर सिंह यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत केलेल्या प्रभावी विकास कामांची दखल घेत, त्यांची पदोन्नतीवर जगातील सर्वात मोठा कुंभमेळा आयोजित करण्यासाठी विशेष जबाबदारी म्हणून करण्यात आली असल्याचे मानले जात आहे. कुंभमेळा, नाशिक च्या ‘स्पेशल इनचार्ज’ म्हणून त्यांना ही मोठी संधी मिळाली आहे.

 

श्रावण हर्डीकर पुन्हा ‘इनचार्ज’

शेखर सिंह यांच्या बदलीनंतर, महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाची धुरा पुन्हा एकदा श्री. श्रावण हर्डीकर, भाप्रसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

सध्याचे पद: श्री. हर्डीकर हे सध्या व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळ, नागपूर म्हणून कार्यरत आहेत.

नियुक्तीचे कारण: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील मेट्रो प्रकल्पाच्या यशस्वी विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली असल्यामुळे, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा प्रभारी आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

श्री. शेखर सिंह यांनी त्वरित श्री. श्रावण हर्डीकर यांच्याकडे आपल्या पदाचा कार्यभार सोपवून , नाशिक येथील कुंभमेळा आयुक्त पदाची सूत्रे हाती घ्यावीत, असे निर्देश शासनाने दिले आहेत.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!