news
Home पिंपरी चिंचवड PCMC च्या ‘स्वच्छता दूतां’चा सन्मान! राज्यात प्रथम, तर देशात सातवे स्थान मिळवून देणाऱ्या सेवकांचा गौरव

PCMC च्या ‘स्वच्छता दूतां’चा सन्मान! राज्यात प्रथम, तर देशात सातवे स्थान मिळवून देणाऱ्या सेवकांचा गौरव

महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व २०२५ चा उत्साह; उप आयुक्त सचिन पवार यांच्याकडून अनोख्या उपक्रमाचे कौतुक, सभागृहात जुन्या गाण्यांच्या सुरांची मेजवानी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

स्वच्छ सर्वेक्षणात शहराला अव्वल बनवणारे ‘सफाई सेवक’ हेच आमचे खरे स्वच्छता दूत!

 


 

उप आयुक्त अण्णा बोदडे यांचे प्रतिपादन; महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त गुणवंत सफाई सेवकांचा गौरव, ‘खेळ पैठणी’ आणि ‘व्हाईस ऑफ मेलडी’ कार्यक्रमांचे आयोजन.

 

 पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याचे अविरत कार्य करणारे ‘सफाई सेवक’ हेच शहराचे खरे स्वच्छता दूत आहेत. त्यांच्या अतुलनीय योगदानामुळेच शहराने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात सातवे आणि राज्यात पहिले स्थान मिळवले. महर्षी वाल्मीकी यांनी ज्याप्रमाणे रामायणाद्वारे समाज जागृती केली, त्याचप्रमाणे हे सफाई सेवक आपल्या कार्यातून स्वच्छतेचा संदेश देतात, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त आयोजित “महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

गुणवंत सफाई सेवकांचा गौरव सोहळा

पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदान येथे झालेल्या या विचार प्रबोधन पर्वात गुणवंत सफाई सेवकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी नगरसदस्य धनराज बिर्दा, उप आयुक्त सचिन पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी अमित पंडित, विधीतज्ञ ॲड. सागर चरण, जनता अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध क्षेत्रीय कार्यालयातील सफाई सेवक उपस्थित होते.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार झालेल्या सफाई सेवकांमध्ये संजय हिंगणे, नवनाथ पिंगळे, अरुणा शेंडे, सुनीता सांगडे, मालती दुबळे, सुमन तांबे, दिपक सारसर, रामकुमार वाल्मिकी, यल्लमा पद्री, रेखा सरपटा, संदीप लांडगे, शाम भालेकर, राजाराम लोंढे, वामन जठार, मनिषा दुबळे, वैशाली कांबळे, दिगंबर वायकर, विक्रम कोकणे, वैभव बुर्डे, अलका आढारी, जयश्री चव्हाण, सुनिल बंडवाल, मनोज गायकवाड, आदित्य राजीवाडे, शर्मिला बुचुडे, जयश्री मलकेकर, जयवंत गायकवाड, गणेश कोंढाळकर, संजिवनी पवार, छाया एखंडे, संगिता भिसे, राकेश चव्हाण, संजना जाधव, महादेव जाधव, विनोद वाल्मिकी, रूपेष बोध, लक्ष्मी लोंढे, रेखा जगताप, राजू वावरे, विलास गडे, कृष्णा देडे, मारुती शिंदे, अनिल पाथरमल, मीना जगताप, जयेंद्र गायकवाड, अनंता भालचीम, कमलेश गायकवाड, राकेश चव्हाण, महादेव जाधव यांचा समावेश होता. यावेळी आरोग्य निरीक्षक गोपाळ धस, संदीप राठोड, समाधान कातड उपस्थित होते.

उप आयुक्त सचिन पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, सफाई सेवकांच्या योगदानाची दखल घेऊन समाजात आदरभाव वाढवणारा हा अनोखा उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले.

महिलांसाठी ‘खेळ पैठणी’ आणि संगीताचा नजराणा

 

यावेळी महिला सफाई सेविकांसाठी “खेळ पैठणी” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक खेळ आणि बक्षिसांच्या वितरणामुळे महिला सेवकांमध्ये ऐक्य, उमेद आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झाला. विजेत्या स्पर्धाकांना उप आयुक्त अण्णा बोदडे आणि सचिन पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सफाई सेवकांचे मनोरंजन व्हावे यासाठी “व्हाईस ऑफ मेलडी” या विनोद निनारिया यांच्या बहारदार संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “आने वाला कल जानेवाला है” (आर. डी. बर्मन) या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जुन्या हिंदी आणि मराठी गाण्यांच्या सुरांनी सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण केले, यात अनेक सफाई सेवकांनीही सहभाग घेतला.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!