news
‘महाराष्ट्रात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड ठरले सर्वाधिक प्रदूषित शहर’; CPCB च्या ‘समीर’ ॲपवरील नोंदीने खळबळ!‘सहकारी संस्थांवरील सत्तेचा मनमानी वापर खपवून घेणार नाही’; नरेंद्र बनसोडे व मानव कांबळे आक्रमक!‘बाल्कनीतून पसरलेल्या आगीत संपूर्ण फ्लॅट खाक, नागरिकांना सुखरूप बाहेर काढले’; रहाटणी व मुख्य अग्निशमन केंद्राची कौतुकास्पद कामगिरी!‘घरात निर्माण करा विश्वासाचे आणि मोकळ्या संवादाचे वातावरण’; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष मार्गदर्शन!‘मंत्री गिरीश महाजन यांच्या बेजबाबदार विधानाने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ’; वंचितांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल!
Home पिंपरी चिंचवड अवैध शस्त्रसाठ्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! पिंपरीत ९ कट्टे आणि ४६ काडतुसे जप्त

अवैध शस्त्रसाठ्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! पिंपरीत ९ कट्टे आणि ४६ काडतुसे जप्त

गुन्हे शाखा युनिट १ कडून चौघांना बेड्या; देहूरोड गोळीबारानंतर आयुक्तालयात हाय अलर्ट | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ९ देशी कट्टे आणि ४६ जिवंत काडतुसांसह ४ आरोपींना अटक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, ६ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध अग्निशस्त्रांविरुद्ध राबविल्या जाणाऱ्या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट १ ला मोठे यश आले आहे. देहूरोड परिसरात एका व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली असून, या कारवाईत ४ आरोपींकडून ९ देशी कट्टे, ५ अतिरिक्त मॅगझिन आणि ४६ जिवंत काडतुसे असा एकूण ८ लाख रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खालील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत:

  • अझरुद्दीन रफिक सुतार (वय ३०): रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव (व्यवसाय: डिलिव्हरी बॉय).

  • वैभव अशोक शेटे (वय ३१): रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव (व्यवसाय: सोशल मीडिया मॅनेजमेंट).

  • सौरभ धनंजय जाधव (वय २७): रा. पाषाण, पुणे (व्यवसाय: इस्टेट एजंट).

  • अक्षय अशोक कांबळे (वय ३१): रा. पाषाण, पुणे (व्यवसाय: मजुरी).

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध शस्त्रधारकांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसाार, गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासादरम्यान पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. २३४/२०२६ (आर्म्स ॲक्ट कलम ३(२५) व मपोका कलम ३७(१) सह १३५) अंतर्गत या आरोपींना अटक करण्यात आली.

जप्त केलेला मुद्देमाल:
  • ९ देशी बनावटीचे कट्टे.

  • ५ अतिरिक्त मॅगझिन.

  • ४६ जिवंत काडतुसे.

  • २ वाहने.

  • एकूण किंमत: सुमारे ८,००,००० रुपये.

सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सपोनि दत्तात्रय गुळीग, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी आणि गुन्हे शाखा युनिट १ च्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग करत आहेत.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!