news
पूरणनगरमध्ये वाळलेल्या झाडांमुळे मृत्यूची टांगती तलवार; वारंवार तक्रार करूनही मनपा उद्यान विभागाचे ‘डोळेझाक’!पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनमध्ये रंगला भक्ती आणि योगाचा अनोखा संगम! ‘द आर्ट ऑफ लिविंग’ आणि भाजपचा संयुक्त उपक्रमरहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेत
Home मुख्यपृष्ठ जपानच्या नव्या वाणिज्यदूत सातो हितोमी आता शिकणार ‘मराठी’! राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याशी मुंबईत चर्चा

जपानच्या नव्या वाणिज्यदूत सातो हितोमी आता शिकणार ‘मराठी’! राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याशी मुंबईत चर्चा

भारत-जपान संबंधांचे अमृत महोत्सवी वर्ष: शिक्षण, कौशल्य आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अस्खलित हिंदी बोलणाऱ्या सातो हितोमी जपानच्या मुंबईतील नव्या वाणिज्यदूत; लवकरच मराठी शिकणार

मुंबई, ६ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुंबई: अलाहाबाद येथून हिंदी भाषेचे शिक्षण घेतलेल्या आणि अस्खलित हिंदी बोलणाऱ्या जपानच्या नवनियुक्त वाणिज्यदूत सातो हितोमी यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मुंबईतील लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र आणि जपानमधील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सातो हितोमी यांनी भारतात दोन वर्षे शिक्षण घेतले असून नवी दिल्ली येथील जपानी दूतावासात त्यांनी साडे नऊ वर्षे कार्य केले आहे. हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवल्यानंतर आता त्या लवकरच मराठी भाषा शिकणार आहेत. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांची लिपी देवनागरी असल्यामुळे मराठी शिकणे सोपे जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे, ओसाका विद्यापीठाचे प्राध्यापक अकिरा ताकाहाशी यांनी १५०० पानांचा ‘मराठी-जपानी’ शब्दकोश तयार केल्याची माहितीही त्यांनी दिली.

  • पायाभूत सुविधा: महाराष्ट्र आणि जपानमध्ये मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेसवे यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये आधीच सहकार्य सुरू आहे.

  • शैक्षणिक परिषद: येत्या नोव्हेंबर महिन्यात जपानच्या वतीने मुंबईत एका मोठ्या शैक्षणिक परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.

  • कौशल्य विकास: टोयोटा कंपनी महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत (ITI) कौशल्य विकास क्षेत्रात कार्य करीत आहे.

  • विद्यापीठ स्तर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात जपानी भाषा विभाग कार्यरत असून, हे सहकार्य अधिक वाढवण्याची विनंती राज्यपालांनी केली आहे.

पुढील वर्षी भारत आणि जपानमधील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची योजना आहे. दोन्ही देशांतील साहित्य, लघुकथा आणि कवितांचे एकमेकांच्या भाषेत भाषांतर करण्याच्या कार्याला चालना देण्याची सूचना राज्यपालांनी केली. तसेच, उत्कृष्ट अनुवादकांना जपानी कंपन्यांच्या सहकार्याने सुवर्ण पदके देण्याची योजना राबवण्याचेही सुचविले आहे.

गेली तीन वर्षे मुंबईत कार्यरत असलेले वाणिज्यदूत यागी कोजी यांची बदली झाल्यानंतर सातो हितोमी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीला जपानच्या कौन्सल शिमादा मेगुमी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि सहसचिव एस. राममूर्ती उपस्थित होते.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!