news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पैशांसाठी माणुसकीला आग! कर्जाच्या वादातून चुलत भावानेच जोडप्यावर ओतले पेट्रोल; भोसरीत नात्याला कलंक

पैशांसाठी माणुसकीला आग! कर्जाच्या वादातून चुलत भावानेच जोडप्यावर ओतले पेट्रोल; भोसरीत नात्याला कलंक

पीडित महिलेवर नेहरूनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू; आरोपी संतोष आणि रंगुबाई आव्हाड या दोघांवर गुन्हा दाखल. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

धक्कादायक! पुण्यात कर्जफेडीच्या वादातून चुलत भावानेच जोडप्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; पत्नी गंभीर भाजली!

 


 

भोसरीतील धावडे वस्तीत घडली घटना; आरोपी पती-पत्नीला अटक, पीडित महिला मध्ये

 

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, १३/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरात एका धक्कादायक घटनेत कर्जाच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका जोडप्याने दुसऱ्या जोडप्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत पीडित पतीच्या पत्नीला गंभीर भाजल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी आणि तक्रारदार हे चुलत भाऊ आणि भावजयीच्या नात्याने एकमेकांशी संबंधित आहेत. ही घटना शुक्रवारी ( ऑक्टोबर ) सकाळी भोसरीतील धावडे वस्ती परिसरात घडली.

याप्रकरणी रावसाहेब शिवराम आव्हाड (, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांची पत्नी सोनाली आव्हाड () या गंभीर जखमी झाल्या आहेत. भोसरी पोलिसांनी तक्रारदाराचा चुलत भाऊ संतोष महादेव आव्हाड () आणि त्याची पत्नी रंगुबाई संतोष आव्हाड () या दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नेमका काय घडला प्रकार?

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष आव्हाड याने काही दिवसांपूर्वी त्याचा चुलत भाऊ असलेल्या तक्रारदाराकडून थोडे कर्ज घेतले होते.

  • तक्रारदार रावसाहेब यांनी जेव्हा कर्जाचे पैसे परत मागितले, तेव्हा आरोपी संतोषला राग आला.
  • संतोषने त्याची पत्नी रंगुबाई हिच्यासह रावसाहेब आणि त्यांची पत्नी सोनाली यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
  • वाद विकोपाला गेल्याने त्यांनी दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि पेट्रोच टाकून जाळून टाकण्याची धमकी दिली.
  • संतप्त झालेल्या आरोपी पती-पत्नीने बाटलीतील पेट्रोल रावसाहेब आणि सोनाली यांच्यावर ओतले.
  • रावसाहेब वेळेवर बाजूला झाल्यामुळे ते बचावले, परंतु त्यांच्या पत्नी सोनाली यांना गंभीर भाजले.
  • आग विझवून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी घटनेला दुजोरा दिला असून, आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. पीडित महिला सोनाली यांच्यावर पिंपरीतील नेहरूनगर येथील एका खासगी रुग्णालयाच्या मध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी रविवारी सकाळी दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक केतन मांजरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!