news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड ‘निवडणुका जवळ आल्या म्हणून पत्रकबाजी’! तुषार कामठेंवर सचिन काळभोर यांचा निशाणा

‘निवडणुका जवळ आल्या म्हणून पत्रकबाजी’! तुषार कामठेंवर सचिन काळभोर यांचा निशाणा

पायाभूत सुविधांच्या समस्या, रेड झोन पुनर्वसनाचा प्रश्न, आणि राष्ट्रवादीतील गटबाजी; शहर विकासाच्या मुद्द्यांवरून भाजप-राष्ट्रवादीत जोरदार टीका. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘आगामी निवडणुकांसाठी ची पत्रकबाजी’: कामठे यांच्यावर भाजपचे सचिन काळभोर यांची सडेतोड टीका

 


 

“आयुक्त प्रशासक असताना गप्प का? शहर विकासाचे खरे मुद्दे विसरले!” – काळभोर यांचा सवाल

 

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी शाम सोनवणे, दिनांक १३/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड शहरात सध्या संशयास्पद निविदा, कोट्यवधींच्या ठेवी मोडणे, टीडीआर घोटाळा आणि विकासकामांच्या वाटपातील रिंग अशा अनेक गंभीर गैरप्रकारांवरून टीकेची झोड उठली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी मावळलेले आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्वी मंजूर झालेल्या भांडवली कामे आणि निविदांची माहिती मागवली आहे.

मात्र, या मागणीवरून आता भाजपने कामठे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे माजी शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी कामठे यांच्यावर टीका करत म्हटले की, “पत्रकबाजी नव्हे, शहर विकासाचा खरा मुद्दा विसरला.”

 

‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संभ्रम’

 

सचिन काळभोर म्हणाले की, “आयुक्त शेखर सिंह हे प्रशासक म्हणून कार्यरत असताना तुषार कामठे मुग गिळून गप्प बसले होते. आता त्यांची बदली झाली आणि आगामी महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे ते केवळ पत्रकबाजी करून नागरिकांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

 

शहरातील गंभीर समस्यांवर मौन का?

 

काळभोर यांनी कामठे यांच्यावर शहरातील अनेक ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ते म्हणाले:

  • पायाभूत सुविधा: निगडी ते पिंपरी मेट्रोच्या कामामुळे भक्ती शक्ती चौक ते मोरवाडी सिग्नलदरम्यान रस्त्यावर हजारो खड्डे पडले आहेत.
  • प्रलंबित प्रकल्प: तास पाणीपुरवठा योजनेत झालेला विलंब, रावेत मार्ग बंद पडणे आणि आकुर्डी जलतरण तलाव बंद अवस्थेत असणे.
  • पुनर्वसन प्रश्न: शहरातील फोटोपास धारकांना रेड झोनमधील पुनर्वसन क्षेत्रात नागरी सुविधा मिळाल्या नाहीत.

“या गंभीर विषयांवर तुषार कामठे एकदाही बोलले नाहीत किंवा त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही,” असा सवाल काळभोर यांनी केला.

 

गटबाजी आणि पुतळा प्रकरण

 

  • राष्ट्रवादीतील गळती: भोसरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटात मोठी गळती झाल्यानंतर, म्हणजेच अजित गव्हाणे माजी नगरसेवकांसह अजित पवार गटात दाखल झाल्यावर, शरद पवार गटाने शहराच्या समस्यांकडे पाठ फिरवली. “आता आयुक्त गेले आणि निवडणुका जवळ आल्या म्हणून ही पत्रकबाजी सुरू झाली आहे,” अशी टीका काळभोर यांनी केली.
  • छत्रपती संभाजी महाराज पुतळा: काही महिन्यांपूर्वी अर्धवट काम झालेल्या पुतळ्यावर ऐतिहासिक मानवंदना कार्यक्रम झाल्यावर कामठे गप्प का होते? पुतळ्याच्या पादुकांना तडे गेल्यावर ते आक्रमक झाले, पण काम अर्धवट असताना कार्यक्रमाला त्यांनी विरोध केला नाही, यावरून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे काळभोर म्हणाले.

“पिंपरी चिंचवडच्या खऱ्या प्रश्नांवर भूमिका घेण्याऐवजी केवळ पत्रकबाजी आणि दिखाऊ राजकारण सुरू आहे. नागरिकांना फसविण्याचे काम थांबवून शहराच्या विकासासाठी ठोस कामगिरी दाखवावी,” असे आवाहन सचिन काळभोर यांनी शेवटी केले.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!