गरजू महिलांची दिवाळी ‘गोड’! – १५० महिलांना दिवाळी शिधा किटचे वाटप
प्रतिभा नारी महिला बचत गट आणि सुदर्शन स्पोर्ट्स क्लबचा सामाजिक बांधिलकीतून स्तुत्य उपक्रम
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: १४ ऑक्टोंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
दिवाळी सण सर्व गरजू आणि तळागाळातील विविध घटकांनाही आनंदात व उत्साहात साजरा करता यावा, या उद्देशाने पिंपरीतील गांधीनगर आणि खराळवाडी परिसरात दीडशे (१५० ) गरजू महिलांना दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले.
प्रतिभा नारी महिला बचत गट आणि सुदर्शन स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळाने विशेष पुढाकार घेऊन, सामाजिक बांधिलकीतून दिवाळी सणाचे औचित्य साधत हा स्तुत्य उपक्रम राबवला.
शिधा किटमध्ये काय?
प्रत्येक किटमध्ये साखर, तेल, मैदा, रवा आणि डाळीचे पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
या शिधा किटचे वाटप खालील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले:
- रजिना फ्रान्सिस (अध्यक्षा, प्रतिभा नारी महिला बचत गट)
- सचिन शिंगे (अध्यक्ष, सुदर्शन स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळ)
- ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जाधव
- भूषण नांदूरकर
- गुलाम अली भालदार (अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघ)
- माजी नगरसेविका उषा गजभार (चोरडिया)
- योगशिक्षिका सरिता अग्रवाल
- श्वेता कापसे (अध्यक्षा, जनमन सोशल फाउंडेशन)
- बहुजन विकास आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष धनंजय घोलप
- समाजसेविका राखी धर
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगतही व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्षा रजिना फ्रान्सिस यांनी केली, तर सूत्रसंचालन सचिन शिंगे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन महिला बचत गटाच्या उषा लष्करे, कमल कलापुरे, वैशाली मिडघुले, मंदा दौंडकर आदींनी केले.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
