news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पुणे ‘जनतेचा अधिकार’: पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वापरलेल्या शासकीय निवासस्थानांचे ‘फोटो’ आणि ‘व्हिडिओ’ रेकॉर्डिंग करण्याची RTI मागणी

‘जनतेचा अधिकार’: पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वापरलेल्या शासकीय निवासस्थानांचे ‘फोटो’ आणि ‘व्हिडिओ’ रेकॉर्डिंग करण्याची RTI मागणी

सरदार रविंद्र सिंह यांचा PMC आयुक्तांना अर्ज; पारदर्शकतेसाठी ३० दिवसांत माहिती आणि निरीक्षणाची तारीख निश्चित करण्याचे आवाहन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

PMC च्या निवासस्थानांची ‘ऑनसाईट’ तपासणी होणार? – RTI अंतर्गत Inspection करण्याची मागणी

 

 

ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाचा पुढाकार; अतिक्रमण, नियमांचे उल्लंघन आणि ५ वर्षांतील दुरुस्ती कार्याचा तपशील तपासणार.

 

पुणे, १६ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

 

पुणे महानगरपालिकेच्या {PMC} मालकीच्या किंवा शासनाच्या/पालिकेच्या भाड्यावर असलेल्या निवासस्थानांच्या वापरात पारदर्शकता आणण्यासाठी आणि त्यातील अतिक्रमण व नियमांचे उल्लंघन तपासण्यासाठी ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूह या संस्थेने माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. या अर्जाद्वारे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी वापरत असलेल्या शासकीय मालमत्तेच्या प्रत्यक्ष तपासणीची {Inspection} परवानगी मागण्यात आली आहे.

माहिती अधिकार आणि Inspection ची मागणी

संस्थेचे अध्यक्ष, अल्पसंख्याक शीख ज्येष्ठ नागरिक सरदार रविंद्र सिंह यांनी हा अर्ज १५ ऑक्टोबर २०२५

रोजी महानगरपालिका आयुक्तांना सादर केला आहे. त्यांच्या प्रेस नोटमधील प्रमुख मागण्या अशा आहेत:

1. निवासस्थानांचा तपशील (गेल्या ५ वर्षांचा):

  • PMC किंवा शासनाच्या मालकीच्या/भाड्याने दिलेल्या सर्व निवासस्थानांची यादी, ज्यांचा वापर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत.

  • गेल्या ५ वर्षांतील (२०२०-२०२५) मालमत्तेच्या दुरुस्ती कार्य, प्रॉपर्टी टॅक्स, पाणी बिल, नोटिसा, दंड आणि कारवाईचा तपशील.

2. प्रत्यक्ष निरीक्षण व छायाचित्रणाची परवानगी:

  • माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम २ (जे)(आय) अंतर्गत, संस्थेच्या प्रतिनिधींना या निवासस्थानांचे प्रत्यक्ष निरीक्षण, छायाचित्रण आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची परवानगी मागितली आहे.

  • निरीक्षणादरम्यान अतिक्रमण, रखरखावाची स्थिती आणि शासकीय नियमांचे उल्लंघन (उदा., अनधिकृत बांधकाम, कर न भरणे) तपासले जाईल.

सरदार रविंद्र सिंह यांनी सांगितले की, “शासकीय मालमत्तेचा वापर हा कायदेशीर आणि पारदर्शक असावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि प्रशासनाची जबाबदारी निश्चित होईल.”

संस्थेने PMC ला माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम  ७(१) नुसार ३० कार्यदिवसांच्या आत मागितलेली माहिती प्रदान करावी आणि निरीक्षणासाठी तारीख व वेळ निश्चित करावी, अशी विनंती केली आहे.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!