news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home मुख्यपृष्ठ पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे किन्नर समुदाय संतप्त! – सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नाने इंदूर हादरले

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे किन्नर समुदाय संतप्त! – सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नाने इंदूर हादरले

बलात्कार/विनयभंगाच्या आरोपींना अटक करण्याची मागणी; २४ किन्नर रुग्णालयात दाखल, जमावाकडून जवाहर मार्गावर चक्का जाम. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

इंदूरमध्ये २४ किन्नरांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न! – पोलीस कारवाईच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल

 


 

नंदलालपुरा परिसरात Acid फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

इंदूर, दि. १७ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:    मध्य प्रदेशातील इंदूर शहरात बुधवारी रात्री दि. १५ ऑक्टोबर २०२५ एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. नंदलालपुरा परिसरात २४ (चोवीस) किन्नरांनी सामुहिकरीत्या फिनाईल (फ्लोअर क्लिनिंग मटेरियल) किंवा Acid पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर या २४ किन्नरांना तातडीने महाराजा यशवंतराव रुग्णालयात  दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
किन्नर समुदायाच्या या टोकाच्या निर्णयामागे पोलीस प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेवर असलेला तीव्र रोष हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे.
 नंदलालपुरा येथील किन्नर डेराशी संबंधित नेत्यांनी आरोप केला आहे की, दोन व्यक्तींनी (ज्यांनी स्वतःला पत्रकार म्हणून ओळखले होते) एका किन्नर व्यक्तीवर कथितरित्या बलात्कार केला आणि त्यांना ब्लॅकमेल केले. पीडितेने मंगळवारी (दि. १४ ऑक्टोबर) पंढरीनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेवर तातडीने कारवाई न केल्यामुळे तसेच गेल्या १० महिन्यांपासून काही जुन्या तक्रारींवरही पोलीस लक्ष देत नसल्याचा आरोप किन्नर समाजाने केला आहे. आरोपींना (विशेषतः सपना हाजी, राजा हाशमी, विजय, वकील पंकज आणि अक्षय) त्वरित अटक करण्याची मागणी किन्नर समुदायाने केली आहे.आत्महत्येच्या प्रयत्नानंतर शेकडो किन्नर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जवाहर मार्गावर चक्का जाम करत जोरदार निदर्शने केली. त्यांनी पंढरीनाथ पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला आणि काही जणांनी पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला, जो पोलिसांनी वेळीच हाणून पाडला.
पोलीस उपायुक्त DCP आनंद कलादगी यांनी ही घटना दोन किन्नर गटांमधील जुन्या वादातून भडकल्याचे संकेत दिले आहेत, मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.बलात्कार/विनयभंगाच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अक्षय आणि पंकज यांच्याविरुद्ध Transgender Protection Act 2019 सह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले असून, किन्नर नेत्यांना आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
प्रशासनाने तात्काळ या घटनेची दखल घेऊन न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याची धमकी किन्नर समुदायाने दिली आहे.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!