news
Home अमरावती पत्रकारितेच्या शिक्षणासाठी IIMC अमरावतीला नवी ओळख; संजय जाजू यांच्या हस्ते १५ एकर जागेची पाहणी, ‘वेळेचा सदुपयोग’ करण्याचे निर्देश

पत्रकारितेच्या शिक्षणासाठी IIMC अमरावतीला नवी ओळख; संजय जाजू यांच्या हस्ते १५ एकर जागेची पाहणी, ‘वेळेचा सदुपयोग’ करण्याचे निर्देश

महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक; नागपूर आकाशवाणीच्या जाहिरात संकलनावरही सचिवांनी भर दिला. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

IIMC अमरावतीचे २०२७ चे सत्र बडनेराच्या नवीन इमारतीत सुरू करण्याचे निर्देश

 


 

बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आखणी करा; केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी दिले निर्देश

 

 

अमरावती,प्रतिनिधी अविनाश वानखेडे ,दि. २३ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

जनसंचार आणि पत्रकारिता क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या भारतीय जनसंचार संस्थान (IIMC), अमरावती ची बडनेरा येथील प्रस्तावित इमारत २०२७ पर्यंत पूर्ण करावी आणि त्याच सत्रापासून नवीन इमारतीत शैक्षणिक कामकाज सुरू करावे, असे निर्देश केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी दिले आहेत.
सचिव जाजू यांनी मंगळवारी अमरावती महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानी आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत हे निर्देश दिले.
सचिव संजय जाजू यांनी IIMC अमरावतीचे प्रस्तावित इमारतीचे बांधकाम करताना प्रत्येक टप्प्याची आखणी करण्याचे आणि पहिला टप्पा दर्जेदाररित्या पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले.
यासोबतच, बदलत्या हवामानात बांधकाम थांबलेले असताना इमारतीला लागणारे दरवाजे, खिडक्या व इतर फर्निचरची गुणवत्ता तपासण्याचे काम करून वेळेचा सदुपयोग करण्याचेही त्यांनी सांगितले.
बडनेरा येथे केंद्र शासनाच्या वतीने IIMC च्या नवीन इमारतीसाठी देण्यात आलेल्या १५ एकर जागेची पाहणी त्यांनी केली. या जागेवर शैक्षणिक वर्ग, प्रशासकीय इमारत, क्रीडा संकुल, विद्यार्थी व कर्मचारी निवासस्थानाची आखणी आणि तांत्रिक बाबींची माहिती त्यांनी घेतली.
या बैठकीला महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, केंद्रीय लोक निर्माण विभागाचे मुख्य अभियंता डी. रायचौधरी, IIMC स्पेशल प्रोजेक्ट डायरेक्टर रश्मी रोजा, भारतीय जनसंचार संस्थेचे क्षेत्रीय निदेशक डॉ. राजेश सिंह कुशवाहा, विशेष कार्य अधिकारी डॉ. मनोज कुमार सोनोने, संजय बसेडिया, अभिजीत कावरे, विष्णू राठोड यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
अमरावती दौऱ्यापूर्वी सचिव संजय जाजू यांनी नागपूरच्या आकाशवाणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरच्या आकाशवाणी, दूरदर्शन, तसेच पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून जाहिरात संकलनाच्या कार्याला गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!