news
पिंपरी-चिंचवडमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित! १७ लाखांहून अधिक मतदारांसाठी ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडले जाणारपिंपरी-चिंचवडकरांनो, तयार राहा! महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीरहक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४५ सदनिकांची पारदर्शक सोडत; महापालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद – आमदार शंकर जगतापपिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला प्रशासकांकडून ‘ग्रीन सिग्नल’! गवळीनगरसह चऱ्होली, दिघी, चिखली परिसरात रस्ते व स्थापत्य कामांना मंजुरी‘हॅपिनेस स्ट्रीट २.०’ ठरला सामाजिक बांधिलकीचा उत्सव! पिंपरी-चिंचवडकरांचा योग, झुम्बा आणि लाईव्ह शोमध्ये तुफान प्रतिसाद
Home पिंपरी चिंचवड पीसीएमसी आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर! – आमदार शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते ‘एशियन किड्स क्लाईंबिंग चॅम्पियनशिप’चे उद्घाटन

पीसीएमसी आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर! – आमदार शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते ‘एशियन किड्स क्लाईंबिंग चॅम्पियनशिप’चे उद्घाटन

आयएमएफ आणि एमएससीएच्या संयुक्त विद्यमाने १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान आयोजन; शिस्त, आत्मविश्वास आणि शारीरिक क्षमतेचे प्रतीक असलेला खेळ. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शहराचा नवा क्रीडा पर्व! पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच ‘आयएफएससी एशियन किड्स क्लाईंबिंग चॅम्पियनशिप २०२५’

 


 

पिंपळे सौदागर येथील अत्याधुनिक क्लाईंबिंग वॉल; शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय स्पर्धा साकार

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे:

पिंपरी-चिंचवड शहराच्या क्रीडा विकासाच्या इतिहासातील एक नवा अध्याय सुरू होत आहे! भारतीय पर्वतारोहण संस्थान (IMF), पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाईंबिंग असोसिएशन (MSCA) यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमधील अत्याधुनिक केंद्रात “आयएफएससी एशियन किड्स चॅम्पियनशिप २०२५” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा १ ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत रंगणार असून, यात आशिया खंडातील तब्बल १३ देशांतील २०० स्पर्धकांचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेमुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर झळकणार आहे.

 

  • उद्घाटन: या भव्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार श्री. शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
  • शहरातील पहिली क्लाईंबिंग वॉल: शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही अत्याधुनिक ‘क्लाईंबिंग वॉल’ संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. पिंपळे सौदागर येथील योगा पार्क आता शहरातील नागरिकांसाठी एक नवे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटर बनले आहे.

 

शत्रुघ्न (बापू) काटे यांचे मत

 

शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या स्पर्धेबद्दल आपले विचार व्यक्त केले:

“पर्वतारोहण हा केवळ खेळ नाही तर शिस्त, आत्मविश्वास आणि शारीरिक क्षमतेचे प्रतीक आहे. आपल्या शहरातील तरुणाईला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि अनुभव मिळावा, या उद्देशाने आम्ही ही संकल्पना राबवली. १३ देशांतील २०० स्पर्धक आपल्या शहरात येत आहेत, ही पिंपरी-चिंचवडसाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

पर्वतारोहण आणि क्लाईंबिंगसारख्या जागतिक दर्जाच्या खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा शहरात आयोजित करण्यात आली आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!