news
Home अकोला आंबेडकर कुटुंबीयांविरोधात सोशल मीडिया पोस्ट! – OBC व वंचितांचे दैवत असलेल्या नेत्यांविरुद्ध कृती, समाजात संतापाची लाट

आंबेडकर कुटुंबीयांविरोधात सोशल मीडिया पोस्ट! – OBC व वंचितांचे दैवत असलेल्या नेत्यांविरुद्ध कृती, समाजात संतापाची लाट

वासुदेवराव धुरदेव, गोपाल गायकवाड, श्रीकृष्ण बोदडे, मनीषा तायडे यांच्यासह मातंग समाजाचा तीव्र निषेध; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट! मूर्तिजापूर मातंग समाजाकडून तीव्र निषेध

 


 

‘ओबीसी आरक्षण लढ्यावरून लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र’; आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर ‘CID’ चौकशीची मागणी

 

मूर्तिजापूर, प्रतिनिधी : विलास सावळे, दि. ३ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात राजे आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट (आपत्तिजनक मजकूर) केल्याबद्दल मूर्तिजापूर येथील मातंग समाजाने तीव्र संताप व्यक्त करत जाहीर निषेध नोंदवला आहे. ही पोस्ट म्हणजे राज्यातील ओबीसी आरक्षण बचाव लढ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

राज्यात ओबीसी आरक्षण धोक्यात आले असताना, सर्वसामान्य ओबीसी समाजाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ओबीसी आरक्षणाचा लढा पुनर्जीवित केला आहे. याला चिडूनच ही विकृत पोस्ट करण्यात आल्याचे मत मातंग समाजाने व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण कालीन प्रचारक तथा अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन तायडे यांनी याबद्दल बोलताना तीव्र आक्षेप घेतला:

💬 “राज्यात ओबीसी आरक्षण दिशाहीन नेतृत्वामुळे संपत असताना, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ओबीसींचा लढा लढवत आहेत. याला चिडून जाती-जातीत भांडण लावून सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे. हे भाजप अथवा महाआघाडीतील एखाद्या सेलचे विकृत कार्य असावे, जो बाळासाहेबांच्या कार्यकर्त्यांना विचलित करण्यासाठी केला गेला आहे.”

निषेध करणाऱ्या मातंग समाजाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना ओबीसी व वंचितांचे दैवत मानले आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे, हे कृत्य देशद्रोहासारखा गुन्हा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

या निषेधाच्या प्रमुख मागण्या:

  • सदर प्रकरणात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सी.आय.डी. (CID) चौकशी करण्यात यावी.
  • संबंधित व्यक्तीवर देशद्रोहासारख्या गुन्ह्याचे कलम नोंदवण्यात यावे.
  • यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे जनतेसमोर आणावे.

अण्णाभाऊ साठे क्रांती सेना आणि मातंग समाजाच्या वतीने गजानन तायडे (हिरपूर), मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते वासुदेवराव धुरदेव, गोपाल गायकवाड, श्रीकृष्ण बोदडे, तसेच अण्णाभाऊ साठे क्रांती सेना महिला जिल्हाध्यक्ष मनीषा तायडे यांच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

आवाहन: ओबीसी समाजाने आरक्षण वाचवण्यासाठी एका निष्ठेने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहावे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना धडा शिकवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!