news
Home पिंपरी चिंचवड लाचखोर PSI प्रमोद चिंतामणी ACB च्या जाळ्यात! – पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याची सीबीआय चौकशी

लाचखोर PSI प्रमोद चिंतामणी ACB च्या जाळ्यात! – पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याची सीबीआय चौकशी

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या समारोपाला मोठी कारवाई; वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचीही चौकशी होण्याची शक्यता. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

पुण्यात खळबळ! पीएसआयवरील लाचखोरीच्या कारवाईची CBI चौकशी; पोलीस दलातील ‘वरिष्ठ’ रडारवर!

 


 

२ कोटींची लाच मागितल्याचा आरोप; पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत; ‘CP, DCP यांना मॅनेज करू’ वक्तव्याने वातावरण तापले

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ३ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रमोद चिंतामणी यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या सापळा कारवाईची दखल थेट केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली आहे. एखाद्या पीएसआयने इतक्या मोठ्या लाचेची मागणी करणे, ही गंभीर बाब मानून सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे, ज्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी ACB आणि CBI च्या रडारवर आले आहेत.

 

पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला ४ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील अटक आरोपीच्या जामीन अर्जावर ‘से’ देण्यासाठी एकूण २ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सापळा कारवाईत पकडण्यात आले. पहिला हप्ता म्हणून ४६ लाख ५० हजार रुपये घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

  • लाचेची मागणी: चिंतामणी याने तक्रारदार वकिलांना थेट ‘मला १ कोटी व साहेबांना (पोलीस निरीक्षक संदिप सावंत) १ कोटी रुपये द्या’ अशी मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
  • गंभीर आरोप: या लाचेच्या मागणीदरम्यान, चिंतामणी याने तक्रारदार वकिलांना “तुम्ही दिलेल्या रक्कमेत आम्ही आमचं बघुन घेऊ. सीपी (पोलीस आयुक्त), डीसीपी (पोलीस उपायुक्त) यांना मॅनेज करु, असे म्हणाले,” असेही फिर्यादीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या वक्तव्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत.

 

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, लाचेच्या मागणीबाबत पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांच्या केबिनमध्ये चर्चा झाली होती.

  • चौकशीचा भाग: चिंतामणी याने पोलीस निरीक्षक संदिप सावंत यांची तक्रारदाराशी भेट घडवून आणली. यावेळी सावंत यांनी तक्रारदारांना, “फिर्यादीचे पैसे मिळत असतील तर ठिक आहे, किती दिवसात पाठवताय सांगा,” असे विचारले होते.
  • संदिग्ध भूमिका: पोलीस निरीक्षक सावंत यांनी प्रत्यक्ष लाचेची मागणी केली नसली तरी, त्यांच्या केबिनमध्ये झालेल्या चर्चेचा आणि त्यांच्या भूमिकेचा उल्लेख फिर्यादीत आहे.

 

लाचेची रक्कम (४५ लाखांच्या बनावट नोटा आणि दीड लाखांची रोकड) असलेली पिशवी घेताना प्रमोद चिंतामणी याला रास्ता पेठेतील पुना कॅफेजवळून ताब्यात घेण्यात आले. त्याने ‘इथे कॅमेरे आहेत,’ असे म्हणून ठिकाण बदलल्याचेही उघड झाले.

  • न्यायालयीन कोठडी: प्रमोद चिंतामणी याला शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
  • राष्ट्रीय दखल: या प्रकरणाची सीबीआयच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील ही कारवाई देशपातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!