news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड PCMC मध्ये कबड्डीचा धुरळा! – २९ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित; ४० हून अधिक राष्ट्रीय पंच करणार परीक्षण

PCMC मध्ये कबड्डीचा धुरळा! – २९ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित; ४० हून अधिक राष्ट्रीय पंच करणार परीक्षण

बाबुराव चांदेरे आणि अतुल बेनके यांचे सहकार्य; पिंपरी-चिंचवड संघ घरच्या मैदानात विजेतेपद पटकावणार का, याकडे लक्ष. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

कबड्डीचा थरार! ३६ वी किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा बुधवारपासून बोपखेलमध्ये

 


 

पिंपरी-चिंचवडला यजमानपद; आमदार अण्णा बनसोडे यांची घोषणा; समारोपाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती अपेक्षित

 

पिंपरी चिंचवड, पुणे ,प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली ३६ वी किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पिंपरी-चिंचवड शहराला यजमानपद मिळाल्यामुळे बोपखेलमध्ये रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा ५ नोव्हेंबर २०२५ पासून श्रीरंग भाऊ धोदाडे क्रीडानगरी, बोपखेल गावठाण येथे सुरू होत आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी (दि. ३ नोव्हेंबर २०२५) पत्रकार परिषदेत स्पर्धेची गटवारी जाहीर केली.

 

  • शुभारंभ: ५ नोव्हेंबरपासून स्पर्धा सुरू होत आहे. पहिल्या दिवशी किशोर गटात परभणी विरुद्ध बीड, पिंपरी चिंचवड विरुद्ध रायगड आणि रत्नागिरी विरुद्ध मुंबई उपनगर पूर्व हे सामने होणार आहेत. किशोरी गटात नाशिक शहर विरुद्ध ठाणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड विरुद्ध नांदेड आणि परभणी विरुद्ध जळगाव हे सामने रंगतील.
  • समारोप: स्पर्धेचा समारोप २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या समारोपाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे.
  • इतर मान्यवर: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्ता भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ हे देखील उपस्थित राहतील, असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

 

गतवर्षी मनमाड येथे झालेल्या स्पर्धेत किशोर गटात परभणीने तर किशोरी गटात नाशिक शहरने विजेतेपद पटकावले होते. पिंपरी चिंचवड संघाला दोन्ही गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

“पिंपरी चिंचवडला निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून, स्थानिक खेळाडूंना यातून प्रोत्साहन मिळते. कबड्डी हा आपल्या परंपरेचा खेळ आहे, अशा स्पर्धांमुळे तरुण वर्ग पुन्हा मैदानावर येतो, हे आनंददायी आहे,” असे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले.

यंदा स्पर्धा शहरातच होत असल्याने पिंपरी चिंचवड संघ घरच्या मैदानाचा लाभ घेऊन विजेतेपद मिळवतो का, याकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

 

सोमवारी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अतुल बेनके, कार्याध्यक्ष दत्तात्रेय कळमकर, सहकार्यवाह दत्तात्रय झिंजुर्डे, राजेंद्र ढमढेरे, खजिनदार प्रकाश पवार, राष्ट्रीय पंचप्रमुख गजानन मोकल, माजी नगरसेवक अविनाश काटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष शशिकांत घुले तसेच सतीश लांडगे, संजय अवसरमल आदी उपस्थित होते. विविध जिल्ह्यांतून येणारे ४० हून अधिक राष्ट्रीय पंच या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.

💬 “कबड्डीचा धुरळा उडवण्यासाठी खेळाडू सज्ज आहेत. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे,” असे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी सांगितले.


 

 स्पर्धेची गटवारी

 

किशोर गट (एकूण ८ गट):

गट समावेश असलेले संघ
‘अ’ परभणी, जळगाव, बीड
“ब” पिंपरी चिंचवड, पुणे शहर, रायगड, सोलापूर
“क” रत्नागिरी, नांदेड, मुंबई उपनगर पूर्व, सिंधुदुर्ग
“ड” जालना, पालघर, नाशिक शहर, हिंगोली
“इ” ठाणे ग्रामीण, उस्मानाबाद, नाशिक ग्रामीण, सातारा
“फ” कोल्हापूर, औरंगाबाद, धुळे, मुंबई शहर पूर्व
“ग” मुंबई उपनगर पश्चिम, अहमदनगर, लातूर, ठाणे शहर
“ह” नंदुरबार, सांगली, मुंबई शहर पश्चिम, पुणे ग्रामीण

किशोरी गट:

गट समावेश असलेले संघ
“अ” नाशिक शहर, मुंबई उपनगर पश्चिम, ठाणे ग्रामीण
“ब” पिंपरी-चिंचवड, नंदुरबार, नांदेड, बीड
“क” परभणी, रत्नागिरी, जळगाव, सोलापूर
“ड” सांगली, ठाणे शहर, सातारा, औरंगाबाद
“इ” पुणे ग्रामीण, अहमदनगर, पालघर, धुळे
“फ” नाशिक ग्रामीण, कोल्हापूर, लातूर, हिंगोली
“ग” जालना, पुणे शहर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग
“ह” मुंबई उपनगर पूर्व, रायगड, मुंबई शहर पश्चिम, मुंबई शहर पूर्व

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!