news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड शिक्षणमंत्र्यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी महापालिकेत कार्यक्रम! – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

शिक्षणमंत्र्यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी महापालिकेत कार्यक्रम! – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

उपायुक्त अण्णा बोदडे, प्रशांत शिंपी, किरण गायकवाड आणि प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह मान्यवर उपस्थित. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

माजी शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विनम्र अभिवादन

 


 

‘शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन’ – आझाद यांची भूमिका आजही महत्त्वाची: महापालिका

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १२ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये हा अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

 

या कार्यक्रमात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

उपायुक्त अण्णा बोदडे, नगररचना विभागाचे सह संचालक प्रशांत शिंपी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते अझिज शेख, अझहर खान, रफीक कुरेशी, हाजी याकुब, आयान शेख, ॲड गणेश मसलेकर, जावेद शहा, रोहन रोकडे, समरीन कुरेशी, तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी, मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या जीवनात त्यांनी शिक्षण, विज्ञान आणि राष्ट्रीय एकता यांना सर्वोच्च महत्त्व दिले.

महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले की, “शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे,” ही मौलाना आझाद यांची भूमिका आजही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांच्या व्यापक विचारांतून शिक्षण क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची प्रेरणा मिळते.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!