news
Home पिंपरी चिंचवड ‘तथागत’ संस्थेकडून संविधानाच्या मूल्यांचे स्मरण! नवी सांगवीत रामजी आंबेडकर व लहुजी साळवे जयंती उत्साहात

‘तथागत’ संस्थेकडून संविधानाच्या मूल्यांचे स्मरण! नवी सांगवीत रामजी आंबेडकर व लहुजी साळवे जयंती उत्साहात

नारायण भागवत यांनी केले प्रास्ताविक, दिलीप कांबळे यांनी केले सूत्रसंचालन; राजेंद्र जगताप, रवींद्र इंगोले, अरुण पवार यांच्यासह मगन सावंत, गुलाम गायकवाड यांनी घेतले परिश्रम. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नवी सांगवीत सुभेदार रामजी आंबेडकर व वीर लहुजी साळवे यांना जयंतीनिमित्त मानवंदना!

 

‘तथागत संस्था’ व ‘रामजी आंबेडकर वाचनालय’ यांच्या वतीने अभिवादन; भारतीय राज्यघटना देऊन मान्यवरांचा सन्मान.

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १८ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

तथागत बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय, नवी सांगवी यांच्या वतीने सुभेदार रामजी आंबेडकर आणि वीर लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

साई चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा भारतीय राज्यघटना (Indian Constitution) देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

डॉ. बबन जोगदंड यांनी यावेळी बोलताना सांगितले, की “भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला घडविण्यात पिता म्हणून सुभेदार रामजी आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे.”

या कार्यक्रमास माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, निवृत्त उपप्राचार्य रवींद्र इंगोले, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, डॉ. बबन जोगदंड, प्रेरणा सहकारी बँकेचे संस्थापक कांतीलाल गुजर, सांगवी विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश भागवत, सुखदेव चोरमले, कृष्णा शिंदे, संपत बनसोडे, सुरेश सकट, निखिल चव्हाण, शंकर गणगे, चंद्रकांत कांबळे, दिलीप शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण भागवत यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप कांबळे यांनी केले, तर आभार मगन सावंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुलाम गायकवाड, सुरेंद्र जाधव, राहुल काकडे, शिवाजी चव्हाण, राजू कोंडके, भाऊ शिंदे, भालचंद्र नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!