news
Home अमरावती राष्ट्रीय स्तरावर अमरावती नवोदयची ‘संगीतमय’ छाप! समूह वादनातही उपविजेतेपद; पुणे विभागातून सर्वाधिक यश

राष्ट्रीय स्तरावर अमरावती नवोदयची ‘संगीतमय’ छाप! समूह वादनातही उपविजेतेपद; पुणे विभागातून सर्वाधिक यश

जवाहर नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त राजेश लखानी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव; विनोद अथीलकर आणि एस. एन. मालवीय यांचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नवोदयच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी! व्हायोलिन आणि 2-डी आर्टमध्ये देशात पहिला क्रमांक

 

राष्ट्रीय एकता समागम-२०२५ मध्ये अमरावती जिल्ह्याचे नाव देशपातळीवर झळकवले; पुणे विभागातून सर्वाधिक यश!

 

अमरावती, दि. २१ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे! पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती येथील दोन विद्यार्थ्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे नुकत्याच झालेल्या २४ व्या राष्ट्रीय एकता समागम-२०२५ मध्ये चमकदार कामगिरी करत जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे.

विद्यालयातील मास्टर वेदांत अथीलकर याने व्हायोलिन वादनामध्ये तर मास्टर हर्षल सोनोने याने 2-डी आर्ट या कला प्रकारामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे.

या दोन प्रथम क्रमांकासोबतच, अमरावती नवोदयच्या विद्यार्थ्यांनी समूह वादन (अकेस्ट्रा) या प्रकारातही यश मिळवले. मास्तर दर्शन निकोडे, जीत खवले, अर्णव बोडखे आणि आरुष पाझरे या विद्यार्थ्यांनी समूह वादनामध्ये उपविजेता क्रमांक पटकाविला.

नवोदय विद्यालय समितीने संपूर्ण देशातील ६६१ नवोदय विद्यालयांमधून विभागीय, क्षेत्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर कला, संस्कृती व संगीताशी संबंधित विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. अमरावतीच्या या विद्यार्थ्यांनी सर्व पातळ्या यशस्वीरित्या पार केल्या.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादर नगर हवेली व दमण या ५ राज्यांचा समावेश असलेल्या पुणे संभागमध्ये एकूण ६ प्रथम क्रमांक पटकावले असून, त्यापैकी एकट्या अमरावती नवोदयने २ प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

नवोदय विद्यालय समिती, दिल्लीचे आयुक्त राजेश लखानी यांनी याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केले.

या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पुणे विभागाच्या उपायुक्त श्रीमती मेरी मनी, तसेच सह उपायुक्त श्री. प्रेमकुमार यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव, उपप्राचार्य एस. हिसवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षक विनोद अथीलकर आणि कला शिक्षक एस. एन. मालवीय यांच्या प्रशिक्षणाने आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हे यश शक्य झाल्याचे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सांगितले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!