शेतकऱ्यांचे कैवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अभिवादन!
पुण्यतिथीनिमित्त मुख्य प्रशासकीय इमारत, वल्लभनगर पुतळा आणि वायसीएम रुग्णालयात कार्यक्रम; अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २६ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वतीने शहरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक हे उपस्थित होते.

-
वल्लभनगर पुतळा: वल्लभनगर येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसदस्या सुलक्षणा धर, महा मेट्रो प्रशासनाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकवाड, संपत पाचुंदकर, वर्षा जगताप आदी उपस्थित होते.
-
संत तुकारामनगर रुग्णालय: संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (YCM) येथे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
वायसीएम रुग्णालयातील कार्यक्रमास माजी नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत धर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. उज्वला अंदूरकर, शैलजा भावसार, मेट्रन वत्सला वाजे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे यांच्यासह अन्य कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचे स्मरण केले आणि त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
