news
Home पिंपरी चिंचवड सेवेचा सन्मान! पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १७ नियत वयोमान व ८ स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव

सेवेचा सन्मान! पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १७ नियत वयोमान व ८ स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव

स्थापत्य सह शहर अभियंता अनघा पाठक, सहाय्यक आरोग्याधिकारी कुंडलिक दरवडे, मुख्याध्यापक मुसर्रत अन्सारी यांचा समावेश; जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले आभार. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवत २५ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त; कार्यकारी अभियंता अनघा पाठक यांना निवृत्तीदिनी ‘सह शहर अभियंता’ पदावर पदोन्नती!

 

अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते सत्कार; ‘सेवानिवृत्त सहकाऱ्यांचे सेवावृत्ती कार्य कायम स्मरणात राहील’

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २९ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत वर्षानुवर्षे उत्तमरित्या सेवा देऊन माहे नोव्हेंबर २०२५ अखेर नियत वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्तीने एकूण २५ अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या सर्व सहकाऱ्यांचा त्यांच्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १७ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या, “सेवानिवृत्त होणारे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आपल्या कार्याचा प्रत्यय दिला आहे. त्यांची जबाबदारीने काम करण्याची पद्धत, कामकाजाप्रती सेवावृत्ती आणि आदरभाव कायम स्मरणात राहतील.” त्यांनी सर्व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पुढील वाटचालीस आरोग्यदायी शुभेच्छाही दिल्या.

या कार्यक्रमास सह आयुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता अभिमान भोसले, प्रेरणा सिनकर, जाहिरा मोमीन, संध्या वाघ, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया वाकडे यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

विशेष योगायोग:

  • कार्यकारी अभियंता अनघा पाठक यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच सह शहर अभियंता या पदावर पदोन्नती देण्यात आली, जो एक सुखद योगायोग ठरला.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले कर्मचारी (१७):

  • स्थापत्य सह शहर अभियंता: अनघा पाठक

  • सहाय्यक आरोग्याधिकारी: कुंडलिक दरवडे

  • मुख्याध्यापक (प्राथमिक शिक्षण): मुसर्रत अन्सारी

  • कार्यालय अधिक्षक: मीनाक्षी पवार

  • कनिष्ट अभियंता: गुरुबसवेश्वर स्वामी जंगम

  • उपशिक्षक: वंदना जाधव, मालन गायकवाड

  • प्लंबर: वासुदेव आल्हाट

  • वॉर्ड बॉय: दिगंबर वायकर

  • रखवालदार: सहदेव तांडेल

  • मजूर: विजय लांडगे, भाऊसाहेब सांडभोर, अनंत येलवंडे, विलास लांडे

  • सफाई कामगार/सेवक: शकील शेख, शांताराम खेंगरे, माया चव्हाण

स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी (८):

  • स्प्रे कुली: पांडुरंग आधारी

  • सफाई कामगार/कचरा कुली: शोभा नाईकनवरे, अंकुश झांझरे, कौशल्या घरत, शंकर शेंडे, लता गोठे, गोविंद घुटे


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!