news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलिसांचा सर्वात मोठा ‘वाहनचोरी’ पर्दाफाश! एकाच वेळी ३९ वाहने जप्त करून १५,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी-चिंचवड पोलिसांचा सर्वात मोठा ‘वाहनचोरी’ पर्दाफाश! एकाच वेळी ३९ वाहने जप्त करून १५,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; सपोनि दिगंबर अतिग्रे, पोउपनि विनायक पाटील यांच्या पथकाने सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई! वाहन चोरांच्या टोळीला बेड्या; ३७ बाईक्ससह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

‘परी-०१’ पथकाकडून ३४ गुन्हे उघडकीस; पिंपरी, भोसरी, सांगवी, निगडीसह मुंबई-ठाण्यातील गुन्हे उकलले

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ३नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ‘परी-०१’ वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत मोठी कामगिरी केली आहे. या पथकाने वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १५ लाख रुपये किमतीच्या ३७ मोटार सायकल आणि ०२ ऑटो रिक्षा असा एकूण ३९ वाहनांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे एकूण ३४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या आयुक्तांच्या आदेशानुसार, परी-०१ पथकाने तपास करत खालील आरोपी आणि एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले:

  1. प्रदीप बाजीराव जगताप, वय ३५ वर्षे, रा. ओवळी गाव, देहूरोड, पुणे.

  2. रविंद्र शिवाजी भालके, वय ३४ वर्षे, रा. मेट्रो स्टेशन, थेरगाव, कांचननगर, देहूरोड, पुणे.

  3. लखन विजय साळुंखे, वय २५ वर्षे, रा. देहूरोड पोलीस स्टेशन जवळ, जनरल हॉस्पिटल शेजारी, देहूरोड, पुणे.

  4. मल्लेश सिद्रामप्पा बिरादार, वय ३८ वर्षे, रा. भेरवनगर, मुळगाव-महाबळेश्वर रोड, महाबळेश्वर, ता. वाई, जि. सातारा.

  5. राजू शंकर मराठे, वय ४६ वर्षे, रा. भैरवनाथ मंदिराच्या बाजूला मामुर्डी गाव, देहूरोड, पुणे.

  6. व एक विधीसंघर्षीत बालक.

या आरोपींकडून १५,००,०००/- रुपये किमतीच्या ३७ मोटारसायकली आणि ०२ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. संदीप आटोळे (परिमंडळ १, पिंपरी चिंचवड), श्री. सचिन हिरे (सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग), श्री. अशोक कडलग (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे) आणि श्री. विजयानंद पाटील (पोलीस निरीक्षक, गुन्हे) यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि आयुक्तालयाबाहेरील उघडकीस आणलेले एकूण ३४ गुन्हे खालीलप्रमाणे आहेत (गुन्हा रजि. नं./कलम):

अ. क्र. पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. (कलम ३०३(२)/३७९)
१ ते ९ पिंपरी पोलीस ठाणे ३९३/२०२५, ४२६/२०२५, ४०६/२०२५, १०२८/२०२३, ४२७/२०२५, ४३७/२०२५, ४३३/२०२५, ७७३/२०२४, ६३८/२०२५
१० ते १५ भोसरी पोलीस ठाणे २६३/२०२५, १७१/२०२५, ३८७/२०२५, ३७४/२०२५, ७६२/२०२५, १६६/२०२५
१६ ते १८ सांगवी पोलीस ठाणे २५२/२०२५, २५३/२०२५, १९४०/२०२५
१९ ते २३ निगडी पोलीस ठाणे १९३/२०२५, १२४८/२०२५, ३६८/२०२५, ३८१/२०२५, ४५२/२०२५
२४ दापोडी पोलीस ठाणे १३३/२०२५
२५ वाकड पोलीस ठाणे १३१४/२०२४
२६ कोपरी पोलीस ठाणे (ठाणे शहर) ५८९/२०२५
२७ विनोबा भावे नगर पोलीस ठाणे (मुंबई) ३८५/२०२३ (भा.द.वि. कलम ३७९)
२८ ते ३१ संत तुकाराम नगर पोलीस ठाणे ३५६/२०२५, ३४०/२०२५, २८०/२०२५, ३२३/२०२५
३२ रावेत पोलीस ठाणे ३३२/२०२५
३३ चिंचवड पोलीस ठाणे ३०५/२०२५
३४ चिखली पोलीस ठाणे ३६६/२०२५

सदरची कामगिरी परी-०१ वाहन चोरी विरोधी विशेष पथकातील सपोनि दिगंबर अतिग्रे, पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील, पोहोवा ९७९ बेडरकर, पोना १२९१ तळपे, पोना १८०७ गेंगजे, पोशि २२९३ शिंदे, पोशि ३३५७ बजवळकर, पोशि ३६०९ डवळे, पोशि २५१३ भुरे, पोशि २१८० पिंजरकर, पोशि २००४ मोघे, पोशि १३०४ जायभाये, पोशि १९८१ जोशी, पोशि ३६०० म्हस्के आणि मपोहोवा १६८८ कोंडे यांनी केली आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!