news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड आळंदीत १ डिसेंबरला दिवसभर वाहतूक बंद! पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले तात्पुरते आदेश

आळंदीत १ डिसेंबरला दिवसभर वाहतूक बंद! पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले तात्पुरते आदेश

सकाळी ०८:०० ते रात्री २०:०० वाजेपर्यंत (८ वाजेपर्यंत) आळंदी शहरात प्रवेशबंदी लागू; मरकळ आणि देहूफाटा चौकाकडून येणाऱ्या वाहनांना मनाई. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आळंदी शहर वाहतुकीसाठी ०१ डिसेंबर रोजी बंद; सार्वजनिक निवडणुकीच्या सभेमुळे ‘या’ मार्गांवर वाहनांना प्रवेश नाही

 

मरकळ, वळणगाव आणि देहूफाटाकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई; पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी तात्पुरते आदेश केले जारी

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. ३० नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज: 

आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक सन २०२५ च्या अनुषंगाने शहरात होणाऱ्या सभेमुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरक्षित व सुरळीत राखण्यासाठी, दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी वाहतूक मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड शहर विवेक पाटील यांनी मोटार वाहन कायद्यातील कलमे ११५, ११६(१)(अ)(ब), ११६(४) आणि ११७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार हे आदेश निर्गमित केले आहेत. हे निर्बंध सकाळी ०८:०० वाजेपासून ते रात्री २०:०० वाजेपर्यंत (८ वाजल्यापर्यंत) लागू असतील.

आळंदी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी (अत्यावश्यक सेवा सुविधांची वाहने वगळूण) खालील मार्गांवर प्रवेशबंदी (नो एन्ट्री) लागू करण्यात आली आहे:

  1. मरकळ गाव बाजूकडून येणारी वाहने: या वाहनांना पी.सी.एस. चौकमार्गे वळणगाव, घडनंद व चाकण, पुणे बाजूकडे जाण्यास मनाई करण्यात येत आहे.

  2. वळणगाव, घडनंद बाजूकडून येणारी वाहने: वळणगाव रोडने आळंदी मार्गे पुणे व चाकण बाजूकडे जाण्यास मनाई करण्यात येत आहे.

  3. देहूफाटा चौकाकडून आळंदीकडे येणारी वाहने: देहूफाटा चौक ते आळंदीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशासाठी मनाई करण्यात येत आहे.

टीप: अत्यावश्यक सेवा सुविधांची वाहने (उदा. रुग्णवाहिका, पोलीस वाहने) तसेच सभेकरिता येणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी वाहनचालकांना वरील आदेशाची अंमलबजावणी करून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!