एमपीएससीकडून २०२६ च्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर!
राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे २०२६ रोजी; गट-ब आणि गट-क सेवा परीक्षांच्या महत्त्वाच्या तारखांची घोषणा
महाराष्ट्र, दि. ६ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सन २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नुकतेच आयोगाच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) जाहीर करण्यात आले आहे. आयोगाने प्रशासकीय सेवेतील महत्त्वाच्या परीक्षांसह गट-ब आणि गट-क सेवा परीक्षांचेही वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे.
आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी याबाबत माहिती दिली असून, उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
| परीक्षेचे नाव | पूर्व परीक्षा | अंदाजित निकाल (पूर्व) | मुख्य परीक्षा | अंदाजित निकाल (मुख्य) |
| महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ | ३१ मे २०२६ | ऑगस्ट २०२६ | ०३ ते २४ ऑक्टोबर २०२६ | फेब्रुवारी २०२७ |
| महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ | १४ जून २०२६ | – | ०५ डिसेंबर २०२६ | – |
| महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ | १२ जुलै २०२६ | – | १३ डिसेंबर २०२६ | – |
ज्या उमेदवारांनी सन २०२५ मध्ये पूर्व परीक्षा दिली आहे, त्यांच्या मुख्य परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
-
राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२५: २९ मार्च २०२६ पासून सुरू ते २३ एप्रिल २०२६ पर्यंत होईल.
-
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५: ०५ मे २०२६ पासून सुरू ते ०९ मे २०२६ पर्यंत होणार.
-
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५: १६ मे २०२६ रोजी होईल.
-
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५: १६ मे २०२६ रोजी होईल.
उपरोक्त सर्व परीक्षांचे निकाल अंदाजे जुलै आणि ऑगस्ट २०२६ मध्ये जाहीर होणे अपेक्षित आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
