news
पिंपरी-चिंचवडमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित! १७ लाखांहून अधिक मतदारांसाठी ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडले जाणारपिंपरी-चिंचवडकरांनो, तयार राहा! महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीरहक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४५ सदनिकांची पारदर्शक सोडत; महापालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद – आमदार शंकर जगतापपिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला प्रशासकांकडून ‘ग्रीन सिग्नल’! गवळीनगरसह चऱ्होली, दिघी, चिखली परिसरात रस्ते व स्थापत्य कामांना मंजुरी‘हॅपिनेस स्ट्रीट २.०’ ठरला सामाजिक बांधिलकीचा उत्सव! पिंपरी-चिंचवडकरांचा योग, झुम्बा आणि लाईव्ह शोमध्ये तुफान प्रतिसाद
Home अमरावती अमरावतीत नागरिकांना मोठा दिलासा! पोलीस कोठडीतील मृत्यू, भ्रष्टाचार आणि खंडणीच्या तक्रारींसाठी नवे व्यासपीठ

अमरावतीत नागरिकांना मोठा दिलासा! पोलीस कोठडीतील मृत्यू, भ्रष्टाचार आणि खंडणीच्या तक्रारींसाठी नवे व्यासपीठ

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्राधिकरणाची स्थापना; पोलीस उप आयुक्त रमेश धुमाळ यांचे आवाहन, तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पोलिसांविरुद्धच्या तक्रारींसाठी अमरावतीत ‘विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण’ कार्यान्वित!

 

 

निवृत्त न्यायाधीश उषा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरण निष्पक्ष चौकशीसाठी सज्ज; वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंतच्या तक्रारींची घेणार दखल

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ६ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

सामान्य नागरिकांना पोलीस विभागाकडून अधिकारांचा गैरवापर किंवा गैरवर्तन झाल्यास निष्पक्ष चौकशीसाठी स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अमरावती येथे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण (DPCA) फेब्रुवारी २०२५ पासून कार्यान्वित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (प्रकाश सिंग प्रकरण २००६) आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने हे प्राधिकरण स्थापन केले आहे.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे कार्यालय प्रमुख तथा पोलीस उप आयुक्त रमेश धुमाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे की, पोलीस विभागाविरुद्ध काही तक्रार असल्यास त्यांनी या प्राधिकरणाकडे दाद मागावी.

या प्राधिकरणाचा मुख्य उद्देश पोलिसांना कायद्याने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर किंवा त्यांच्याकडून झालेल्या गंभीर गैरवर्तनाबाबत नागरिकांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करणे हा आहे.

  • अध्यक्ष: निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उषा ठाकरे.

  • सदस्य: पी. टी. पाटील (निवृत्त पोलीस अधीक्षक) आणि पंकज निखार (नागरी सदस्य).

  • चौकशीचे अधिकार: हे प्राधिकरण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंतच्या (Senior Police Inspector) दर्जाच्या पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करू शकते.

  • राज्य प्राधिकरण: पोलीस उप-अधीक्षक किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे (मुंबई) केल्या जातात.

प्राधिकरणाला खालील गंभीर तक्रारींवर चौकशी करण्याचे अधिकार आहेत:

  • पोलीस कोठडीतील मृत्यू किंवा गंभीर दुखापत.

  • बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न.

  • विहीत कार्यपध्दती न अनुसरता केलेली अटक.

  • भ्रष्टाचार, खंडणी उकळणे.

  • जमीन किंवा घर बळकावणे.

  • इतर गंभीर कायदेशीर उल्लंघन किंवा कायदेशीर अधिकाराचा दुरुपयोग.

नागरिक तक्रार लेखी स्वरुपात (मराठी, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये) साध्या कागदावर किंवा प्राधिकरणाच्या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरुपात दाखल करू शकतात. तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

चौकशीत तथ्य आढळल्यास, प्राधिकरण संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करते.

अमरावतीसह पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि कोकण विभाग (नवी मुंबई) येथे एकूण सहा विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणे कार्यरत आहेत.


📍 कार्यालयीन संपर्क:

  • पत्ता: विशेष आय.जी.पी. बंगला ते शासकीय विश्राम गृह रोड, गुलमोहर अपार्टमेंटचे बाजूला, कॅम्प, अमरावती-४४४६०२.

  • दूरध्वनी: ०७२१/२९९०३०६

  • ई-मेल: dpca.amt@mahapolice.gov.in


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!