41
शिवसेनेचे माजी सभापती अनिल सोनटक्के यांचे वडील मानिकराव सोनटक्के यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन
तुकडोजी महाराजांच्या सेवा कार्यात सक्रीय सहभाग; यावली शहीद येथील ग्रामस्थांकडून श्रद्धांजली
अमरावती, दि. ८ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती तालुक्यातील यावली शहीद येथील ज्येष्ठ नागरिक मानिकराव सोनटक्के यांचे सोमवारी (दि. ८ डिसेंबर २०२५) ८२ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.
ते पंचायत समितीचे माजी सभापती आणि शिवसेनेचे नेते अनिल सोनटक्के यांचे वडील होते. दिवंगत मानिकराव सोनटक्के यांचा तुकडोजी महाराजांच्या सेवा कार्यांमध्ये सक्रीय सहभाग होता. त्यांनी यावली येथील हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणूनही नोकरी केली होती आणि त्यांना समाजाविषयी प्रचंड तळमळ होती.
त्यांच्या पश्चात सोनटक्के असा मोठा आप्त परिवार आहे. समस्त नागरिकांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
