news
पिंपरी-चिंचवडमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना निश्चित! १७ लाखांहून अधिक मतदारांसाठी ३२ प्रभागांतून १२८ नगरसेवक निवडले जाणारपिंपरी-चिंचवडकरांनो, तयार राहा! महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीरहक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण! प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४५ सदनिकांची पारदर्शक सोडत; महापालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद – आमदार शंकर जगतापपिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला प्रशासकांकडून ‘ग्रीन सिग्नल’! गवळीनगरसह चऱ्होली, दिघी, चिखली परिसरात रस्ते व स्थापत्य कामांना मंजुरी‘हॅपिनेस स्ट्रीट २.०’ ठरला सामाजिक बांधिलकीचा उत्सव! पिंपरी-चिंचवडकरांचा योग, झुम्बा आणि लाईव्ह शोमध्ये तुफान प्रतिसाद
Home पिंपरी चिंचवड फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार आचरणात! पिंपरी-चिंचवड मनपाच्या महिला सक्षमीकरण योजनांचा पिंपळे सौदागरमध्ये प्रचार

फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार आचरणात! पिंपरी-चिंचवड मनपाच्या महिला सक्षमीकरण योजनांचा पिंपळे सौदागरमध्ये प्रचार

समूह संघटक अमोल कावळे, अस्मिता गडचे, राजश्री खोत यांनी केले मार्गदर्शन; प्राजक्ता जाधव, राणीबाई वाघमारे, जयश्री शिंगोटे यांची विशेष उपस्थिती. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपळे सौदागरमध्ये महिला सक्षमीकरणावर कार्यशाळा; महापालिकेच्या ‘सक्षम’ आणि ‘ सक्षमा’ प्रकल्पांतर्गत मार्गदर्शन

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट; मनस्वी आणि श्री संपदा बचत गटातील ३५ महिलांचा सहभाग

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.९ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून, पिंपळे सौदागर येथे मनस्वी सक्षम महिला बचत गट आणि श्री संपदा महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये दोन्ही महिला बचत गटाच्या एकूण ३० ते ३५ महिला सदस्य उपस्थित होत्या.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः महानगरपालिका, महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवतात. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा सक्षम प्रकल्प तसेच सक्षमा प्रकल्प अंतर्गत शहरात विविध ठिकाणी महिला बचत गटांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक प्रगल्भता आणण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांमध्ये खालील बाबींचा समावेश असतो:

  1. आर्थिक साहाय्य व कर्ज: बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी बीज भांडवल (Seed Capital) आणि महापालिकेकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे.

  2. कौशल्य विकास प्रशिक्षण: महिलांना शिवणकाम, खाद्यप्रक्रिया, सौंदर्य प्रसाधने (Beauty Parlour), हस्तकला, संगणक (Computer Skills) आणि पॅकेजिंग अशा विविध क्षेत्रांत व्यावसायिक प्रशिक्षण देणे.

  3. उत्पादनासाठी बाजारपेठ: बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शने, जत्रा आणि स्टॉल्सचे आयोजन करणे.

  4. आरोग्य आणि शिक्षण: महिला आणि त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य तपासणी शिबिरे तसेच मुलांसाठी शैक्षणिक मदत योजना राबवणे.

  5. नेतृत्व विकास: बचत गटातील महिलांना राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करणे.

या कार्यशाळेत  सक्षमा प्रकल्प- मैथिली अस्मिता गडचे, FC field co-ordinater राजश्री खोत, समन्वयक दिपाली अंभोरे, सी एफ ए आर च्या वर्कर नीलम सरोदे, आरंभ फेडरेशन च्या खजिनदार मीनाक्षी शेट्टेवार यांनी बचत गटातील महिलांना योग्य मार्गदर्शन केले.

महापालिकेचे समूह संघटक अमोल कावळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत राबवण्यात येणारे उपक्रम व योजनांची सविस्तर माहिती दिली. महिला बचत गटांमार्फत समाजामध्ये या योजनांचा प्रचार व प्रसार कशा पद्धतीने केला जाईल, यावर त्यांनी भर दिला.

मनस्वी सक्षम महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्राजक्ता जाधव यांनी भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

प्राजक्ता जाधव पुढे म्हणाल्या, “बहुजनांच्या महिलांना शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचे काम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी केले. फुले दाम्पत्यांचा हा विडा पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये पारित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने समाजातील महिलांना त्यांचा हक्क कायद्याने दिलेला आहे.”

या कार्यशाळेसाठी मनस्वी सक्षम महिला बचत गटाच्या उपाध्यक्ष राणीबाई वाघमारे, सचिव जयश्री शिंगोटे, व सदस्य सुनंदा लोहकरे, प्रज्ञा जगताप, नेहा जगताप, नंदा सोनटक्के, प्रियंका सूर्यवंशी, अश्विनी सूर्यवंशी, कल्पना वाघमारे, प्रगती नांगरे तसेच श्री संपदा महिला बचत गटाच्या अध्यक्षा अस्मिता गडचे, सचिव रंगलता राऊत, सदस्य सुनिता गायकवाड, स्वाती जाधव, अक्षदा ओव्हाळ, पुष्पलता जेना, मीना धनवे आणि आझाद महिला बचत गटाच्या अध्यक्षा अनिता दिवे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड. प्रियंका ढगे यांनी केले.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!