खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या आदेशानंतरही वीज वितरण विभागाचा ‘टाळाटाळ’! निगडी सेक्टर २२ मधील नागरिक संतप्त
वारंवार वीज खंडित होत असल्याने महिला, विद्यार्थी व वृद्धांचे हाल; ‘एमएसईबी’ नवीन केबल कधी टाकणार?
शिरूर, प्रतिनिधी शाम सोनवणे, दि.१२ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
शिरूर लोकसभा मतदारसंघातील निगडी सेक्टर क्र. २२ मधील अंकुश आनंद बिल्डिंग बी-१५ सोसायटीमध्ये वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न कायम असून, वारंवार केबल ब्रेक होत असल्याने नागरिकांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर समस्येमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, व्यावसायिक आणि गृहिणी या सर्वांना अंधारात राहावे लागत आहे. अभ्यास, आरोग्य समस्या आणि दैनंदिन गरजांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी परिसर अंधारात असल्याने सुरक्षेचा धोकाही निर्माण झाला आहे.
या परिसरातील गंभीर परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पार्टी) पिंपरी-चिंचवड शहर सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुनील कांबळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी ही समस्या थेट शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोर मांडली.
-
खासदार कोल्हे यांनी सुनील कांबळे यांनी केलेल्या पाठपुराव्याची तात्काळ दखल घेतली.
-
८ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाच्या (M.S.E.D.C.L.) निगडी विभागाला तातडीने पत्र पाठवले.
-
त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नवीन केबल टाकण्याचे निर्देश दिले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रात कार्यकारी अभियंता, निगडी विभाग यांना विनंती केली आहे की, त्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना द्याव्यात आणि नियमानुसार तातडीने योग्य ती कार्यवाही करावी.
खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेबांनी तातडीने लेखी आदेश देऊनही, एमएसईबी प्रशासनाकडून अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही, ही खेदजनक बाब आहे. यामुळे सोसायटीतील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
नागरिकांच्या मनात आता एकच प्रश्न आहे:
-
“एमएसईबी प्रशासन नवीन केबल टाकण्याचे काम कधी सुरू करणार?”
-
“खासदार साहेबांनी दिलेल्या पत्राची दखल घेऊन काम तात्काळ सुरू करावे!”
अंकुश आनंद बी-१५ सोसायटीतील महिला, युवक, नागरिक आणि कार्यकर्ते यांच्या वतीने एमएसईबी प्रशासनाने लवकरात लवकर नवीन केबल टाकून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
