news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home पिंपरी चिंचवड “चुकीच्या कामांना माफी नाही!” पिंपरीतील ‘त्या’ पोल दुर्घटनेप्रकरणी महावितरणकडून दोषींवर कारवाईचा बडगा

“चुकीच्या कामांना माफी नाही!” पिंपरीतील ‘त्या’ पोल दुर्घटनेप्रकरणी महावितरणकडून दोषींवर कारवाईचा बडगा

खांब कोसळून महिला जखमी झाल्याच्या प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांना समजपत्र; सुहास कुदळे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाला जाग. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महावितरणचा निष्काळजीपणा नडला! पिंपरी कॅम्पमधील ‘त्या’ दुर्घटनेप्रकरणी कर्मचाऱ्यांवर कारवाई; युवा कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याला यश


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २८ जानेवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “चुकीच्या घटना थांबल्याच पाहिजेत आणि अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे,” या निर्धाराने पिंपरीतील युवा सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. पिंपरी कॅम्प परिसरातील एका भीषण दुर्घटनेप्रकरणी महावितरणने अखेर दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून त्यांना समजपत्र बजावले आहे.

गेल्या ९ नोव्हेंबर रोजी पिंपरी कॅम्पमधील शगुन चौक ते मंडई परिसरात मेंटेन्सच्या कामासाठी महावितरणच्या वतीने एक दिवस आधीच खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. मात्र, या कामात कमालीची निष्काळजी वर्तवण्यात आली. या खड्ड्यामुळे शेजारील विजेचा खांब (पोल) अचानक कोसळला आणि एका निष्पाप महिलेला गंभीर दुखापत झाली होती. या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.

या घटनेनंतर संबंधित दोषी अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सुहास कुदळे यांनी लावून धरली होती. महावितरणच्या पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मुंडे यांनी या प्रकरणाची दखल घेतली. या घटनेत प्रथमदर्शनी दोषी आढळलेले कर्मचारी श्री. संजय नायकवडी आणि श्री. प्रकाश देठे यांच्यावर कारवाई संदर्भात समजपत्र बजावण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात काही काळ अडथळा आला होता. मात्र, निवडणूक प्रक्रिया संपताच कुदळे यांनी पुन्हा सक्रिय होत प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. “ही लढाई कोणत्याही स्वार्थासाठी नसून आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी आहे,” अशी भावना सुहास कुदळे यांनी व्यक्त केली आहे.

महावितरणने केलेल्या या कारवाईमुळे भविष्यात अशी कामे करताना कर्मचारी आणि ठेकेदार आवश्यक ती खबरदारी घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा कामांवर प्रशासनाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे आता मार्गी लावली जातील, असा विश्वासही कुदळे यांनी व्यक्त केला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!