news
“बाळापूर तालुक्यातील जुगार अड्ड्याचा पर्दाफाश!” गुन्हे शाखेने (LCB) रंगेहात पकडले १७ आरोपी; शेगाव, अकोला आणि वाशिममधील जुगारांचे जाळे उघड“दोन समाजांमध्ये भडका उडवणाऱ्या पोस्टवर पोलिसांची स्वतःहून फिर्याद!” डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई; यश शर्मा आणि निरंज ठाकूर अटकेत, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू“अस्वच्छता आणि प्लास्टिक वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले!” ३१ हजार रुपयांचा दंड वसूल; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने प्रभाग ८ आणि ९ मध्ये प्रशासनाचा ‘ॲक्शन मोड’“भविष्यात रस्ता पुन्हा उकरावा लागू नये यासाठी आताच समन्वय ठेवा!” महापौर रवि लांडगे यांचा पाहणी दौरा; प्रभाग ५ मधील विकासकामांचा घेतला आढावा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना“शिक्रापूर ते जातेगावपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजने लावला छडा!” ६ महिला आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; रिक्षा आणि ट्रकचा वापर करून पसार होणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Home पिंपरी चिंचवड “वय ६४, पण हिंमत वाघासारखी!”; चोराशी नडल्या निवृत्त अधिकाऱ्याच्या पत्नी; रस्त्यावर फरफटत नेले तरी सोडली नाही पकड

“वय ६४, पण हिंमत वाघासारखी!”; चोराशी नडल्या निवृत्त अधिकाऱ्याच्या पत्नी; रस्त्यावर फरफटत नेले तरी सोडली नाही पकड

एक चोरटा जागीच जेरबंद, दोन साथीदार फरार; काळेवाडी पोलिसांनी केला धाडसी महिलेचा विशेष सत्कार, परिसरात कौतुकाचा वर्षाव. ( २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रहाटणीत ज्येष्ठ महिला ठरली ‘रणरागिणी’; फरफटत नेले तरी साखळी सोडली नाही, एका चोरट्याला नागरिकांच्या मदतीने पकडले


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड/रहाटणी : रहाटणी परिसरात मंगळवारी पहाटे एका धाडसी ज्येष्ठ दाम्पत्याने साखळी चोराचा प्रयत्न केवळ हाणून पाडला नाही, तर जीवाच्या आकांताने एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चोरट्याने ३.८० लाख रुपयांची सोन्याची साखळी खेचल्यानंतर महिलेने त्याला घट्ट पकडून ठेवले. यावेळी चोरट्याने त्यांना रस्त्यावरून फरफटत नेले, तरीही त्यांनी त्याची पकड ढिली होऊ दिली नाही. त्यांच्या या शौर्याचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.

तक्रारदार आत्माराम माने (वय ६४, निवृत्त वरिष्ठ शासकीय अधिकारी) आणि त्यांच्या पत्नी मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास रहाटणी येथील त्यांच्या गृहनिर्माण संस्थेतून फिरण्यासाठी बाहेर पडले होते. नखाते चौकाजवळून चालत असताना एका दुचाकीवरून तीन तरुण त्यांच्या जवळ आले. त्यापैकी एक जण खाली उतरला आणि त्याने माने यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची साखळी जोरात खेचली.

साखळी खेचल्यानंतर चोरटा पळून जात असताना, या धाडसी महिलेने त्याचा हात आणि हातातील धातूचे ‘कडे’ घट्ट पकडले. चोरट्याने स्वतःला सोडवून घेण्यासाठी त्यांना जमिनीवर पाडून रस्त्यावरून फरफटत नेले, मात्र त्यांनी हार मानली नाही आणि आरडाओरडा सुरू केला. पत्नीची ओढाताण होत असल्याचे पाहून आत्माराम माने आणि परिसरातील रिक्षाचालक व नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि त्या चोरट्याला जागीच पकडले.

नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याचे नाव संजय लुनाक्का (वय २९, रा. नांदेड) असे असून, काळेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचे इतर दोन साथीदार दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. लुनाक्का हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे तिघेही १५ दिवसांपूर्वीच पुण्यात गुन्हे करण्याच्या उद्देशाने आले होते.

या झटापटीत महिलेच्या हातापायाला जखमा झाल्या आहेत, मात्र त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ३.८० लाखांचे सोने वाचले. काळेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी या धाडसी महिलेची भेट घेऊन त्यांच्या शौर्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार केला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!