news
“दोन समाजांमध्ये भडका उडवणाऱ्या पोस्टवर पोलिसांची स्वतःहून फिर्याद!” डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई; यश शर्मा आणि निरंज ठाकूर अटकेत, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू“अस्वच्छता आणि प्लास्टिक वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले!” ३१ हजार रुपयांचा दंड वसूल; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने प्रभाग ८ आणि ९ मध्ये प्रशासनाचा ‘ॲक्शन मोड’“भविष्यात रस्ता पुन्हा उकरावा लागू नये यासाठी आताच समन्वय ठेवा!” महापौर रवि लांडगे यांचा पाहणी दौरा; प्रभाग ५ मधील विकासकामांचा घेतला आढावा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना“शिक्रापूर ते जातेगावपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजने लावला छडा!” ६ महिला आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; रिक्षा आणि ट्रकचा वापर करून पसार होणाऱ्या टोळीचा पर्दाफाश“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड
Home पिंपरी चिंचवड “शोध पत्रकारितेला दिली नवी दिशा!”; ज्येष्ठ पत्रकारांकडून विकास शिंदे यांच्या लेखणीचे कौतुक; पत्रकार कक्षात रंगला सोहळा

“शोध पत्रकारितेला दिली नवी दिशा!”; ज्येष्ठ पत्रकारांकडून विकास शिंदे यांच्या लेखणीचे कौतुक; पत्रकार कक्षात रंगला सोहळा

शहरातील मुख्य प्रवाहातील पत्रकारांचे वाढदिवस आता होणार साजरे; सुरज साळवे यांची घोषणा, पत्रकारांच्या स्नेहमिलनाने भारावले वातावरण. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शोध पत्रकारितेचा बुलंद आवाज; पत्रकार विकास शिंदे यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये गौरवपूर्ण वाढदिवस साजरा


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : शोध पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाजातील त्रुटींवर बोट ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे ‘सिविक मिरर’चे प्रतिनिधी विकास शिंदे यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. PC CITY PRO आणि पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने महानगरपालिकेतील भा.वी. कांबळे पत्रकार कक्षात केक कापून हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी ‘PC CITY PRO’ चे मुख्य सुरज साळवे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या शहरातील मुख्य प्रवाहातील पत्रकारांचा वाढदिवस यापुढे PC CITY PRO व शहर पत्रकार संघाच्या वतीने नियमितपणे साजरा केला जाईल,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांनी विकास शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना सांगितले की, “विकास शिंदे यांनी शोध पत्रकारितेला नवी दिशा दिली आहे. महानगरपालिकेतील ‘बातमीच्या मागील बातमी’ शोधण्याचे त्यांचे कौशल्य तरुण पत्रकारांसाठी आदर्श आहे.” त्यांच्या लेखणीतून समाजातील अन्यायग्रस्तांना असाच न्याय मिळत राहावा, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

या स्नेहसोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार प्रवीण शिर्के, विकास गायकांबळे, मॅक्स मंथन डेली न्यूजचे प्रतिनिधी शाम सोनवणे, सायली कुलकर्णी, शहनाज कुरणे, दिलीप देहाडे, संतोष जरड, युनूस खतीब, मुकेश जाधव, गणेश शिंदे, निलेश सायंकर आणि पंकज लालझरे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विकास शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील या नव्या उपक्रमामुळे शहर पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!