news
पत्रकार कक्षात रंगला सत्कार सोहळा! महापौर, उपमहापौर आणि पक्षनेत्यांना पत्रकारांकडून शुभेच्छा; प्रशासकीय पारदर्शकतेवर भरमहापालिकेत नव्या पर्वाची सुरुवात! प्रशांत शितोळे सभागृह नेते, तर अनुभवी भाऊसाहेब भोईर विरोधी पक्षनेतेपदी‘स्प्लेंडर-पल्सर’ चोरणाऱ्या टोळीचा महाळुंगे पोलिसांनी केला पर्दाफाश; सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई“ऊर्जा वाचवा, भविष्य वाचवा!” महाऊर्जाकडून ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम; आकर्षक रोख बक्षिसांची लयलूटपिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी ‘डी-फार्मसी’ पदवीधर रवी लांडगे; उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची ‘बिनविरोध’ निवड, भाजपचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी ‘डी-फार्मसी’ पदवीधर रवी लांडगे; उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची ‘बिनविरोध’ निवड, भाजपचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व!

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी ‘डी-फार्मसी’ पदवीधर रवी लांडगे; उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची ‘बिनविरोध’ निवड, भाजपचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व!

शहराच्या विकासाचा 'पिंपरी-चिंचवड पॅटर्न' राबवणार; महापौर रवी लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पदभार स्वीकारताच निर्धार. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडवर भाजपचा भगवा! महापौरपदी रवी लांडगे तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची ‘बिनविरोध’ निवड


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ६ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. महापालिकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या महापौरपदी उच्चशिक्षित (डी. फार्मसी) रवी लांडगे यांची, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उर्मिला काळभोर यांनी उपमहापौर पदाचा अर्ज मागे घेतल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

पदभार स्वीकारण्यापूर्वी नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांनी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या थोर महापुरुषांना अभिवादन केले. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार अण्णासाहेब मगर आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले.

महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात आयोजित विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, उमाताई खापरे आणि गटनेते प्रशांत शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे शहरावर शोककळा पसरली आहे. याचे भान राखत भारतीय जनता पक्षाने कोणत्याही प्रकारचा जल्लोष, ढोल-ताशे किंवा फटाक्यांची आतिषबाजी न करता अत्यंत साधेपणाने ही निवड प्रक्रिया पार पाडली.

“पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला पूर्ण न्याय देईन. प्रलंबित विकासकामांना गती देऊन शहराचा कायापालट करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे,” असा निर्धार महापौर रवी लांडगे यांनी व्यक्त केला. तर उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महिला सक्षमीकरणावर आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.

या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नव्या जोमाने शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!