news
Home पिंपरी चिंचवड १० ऑगस्ट रोजी देहू येथील मातृछाया अनाथ आश्रमात सामाजिक उपक्रमांनी आठवण ताजी

१० ऑगस्ट रोजी देहू येथील मातृछाया अनाथ आश्रमात सामाजिक उपक्रमांनी आठवण ताजी

देहू येथील मातृछाया अनाथ आश्रमात स्व. सुरेश शेठ देवासी यांची आठवण ताजी; नितीनभाऊ युवा मंचाकडून अन्नदान | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कट्टर मनसैनिक स्व. सुरेश शेठ देवासी यांचा वाढदिवस मातृछाया अनाथ आश्रमात उत्साहात साजरा; ‘नितीनभाऊ युवा मंच’तर्फे अन्नदान व शैक्षणिक साहित्याचे वाटप!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: ‘नितीनभाऊ युवा मंच’च्या वतीने कट्टर मनसैनिक स्व. सुरेश शेठ देवासी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी देहू येथील मातृछाया अनाथ आश्रमात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या उत्साहात आणि भावूक वातावरणात स्व. देवासी यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी नितीनभाऊ युवा मंचाच्या वतीने अनाथ आश्रमातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच स्व. देवासी यांच्या वडिलांच्या व भावाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर आश्रमातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमातील लहान मुलांनी व शिक्षकांनी स्व. देवासी यांच्या आठवणींना उजाळा देत शुभेच्छा दिल्या.

या सामाजिक उपक्रमास ‘नितीनभाऊ युवा मंच’चे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्व. देवासी यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये नितीन चव्हाण, भेराराम देवासी, राजू चव्हाण, उमेश राठोड, आकाश पवार, सतीश चव्हाण, राहुल चव्हाण, अल्ताफ मुजावर, पवन पवार, जाधव (दाजी), कुणाल, दुर्गाराम देवासी, गुजर भरत देवासी, सारे देवासी, विशाल राठोड, कया डोंगरे, विशाल ओरसे, दीपक भंडारी, देवासी मामा आणि हेमराज देवासी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नितीनभाऊ युवा मंचाच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनाथ आश्रम प्रशासन आणि परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!