news
Home पिंपरी चिंचवड ‘बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध’; शाळा-महाविद्यालयांना मिळणारे छापील वेळापत्रकच अंतिम!

‘बोर्ड परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध’; शाळा-महाविद्यालयांना मिळणारे छापील वेळापत्रकच अंतिम!

नऊ विभागीय मंडळांमार्फत होणार परीक्षांचे आयोजन; विद्यार्थ्यांना व पालकांना आगाऊ नियोजनासाठी वेळापत्रक उपलब्ध | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

१० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार लेखी परीक्षा!

पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १० नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. तर इयत्ता १० वीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होतील. इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत पार पडतील. परीक्षांचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सांगितले की, “संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी आणि आगाऊ नियोजनासाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना छापील स्वरूपात (Printed copy) मिळणारे वेळापत्रकच अंतिम आणि अधिकृत मानले जाईल.”
सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲपवर (WhatsApp) व्हायरल होणाऱ्या अथवा अनधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहनही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!