news
स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष मोहीम; क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून प्रत्यक्ष गृहभेटींवर भरपिंपरी-चिंचवडमधील विजेत्या गणेश मंडळांवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून पारितोषिकांचा वर्षाव!स्वातंत्र्यदिन आणि महापौर रवि लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य; आचार्य अत्रे रंगमंदिरात उपमहापौर शर्मिला बाबर व माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा लांडगे यांच्या हस्ते उद्घाटनमृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी, मुलांचे संपूर्ण शिक्षण व वैद्यकीय विम्याची कंपनीकडून ग्वाही; सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांची माहितीनिविदा रकमेत प्रचंड वाढ; मूळ ₹३१२ कोटींचा प्रकल्प तब्बल ₹५६२.८० कोटींवर! उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमधील विजेत्या गणेश मंडळांवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून पारितोषिकांचा वर्षाव!

पिंपरी-चिंचवडमधील विजेत्या गणेश मंडळांवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून पारितोषिकांचा वर्षाव!

भोसरी, निगडी, चिंचवडसह शहरातील १२३ गणेश मंडळांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके; 'जय गणेश भूषण' पुरस्कारांची घोषणा - १० ऑगस्ट २०२६

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे पिंपरी-चिंचवडमधील विजेत्या गणेश मंडळांना १४ लाख २० हजारांची पारितोषिके जाहीर; भोसरीच्या कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळाला ५१ हजारांचे प्रथम पारितोषिक!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १० ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२५-२६’ मधील पिंपरी-चिंचवड शहर महानगरपालिका विभागाचा निकाल आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील २९५ गणेश मंडळांनी, १४ शाळांनी आणि २५ गृहनिर्माण सोसायट्यांनी सहभाग घेतला होता. यातील गुणवंत व प्रबोधनात्मक देखावे सादर करणाऱ्या १२३ गणेश मंडळांसह शाळा व सोसायट्यांना एकूण १४ लाख २० हजार रुपयांची रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
पिंपरी-चिंचवड विभागातील मुख्य विजेती ५ मंडळे (रोख पारितोषिके व श्रीमंत दगडूशेठ चषक):
  • प्रथम क्रमांक (₹५१,०००/- व चषक): कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ, भोसरी (देखाव्याचा विषय: ‘शिव नृसिंह’)
  • द्वितीय क्रमांक (₹४५,०००/-): सुवर्णयुग मित्र मंडळ, पिंपरी (देखाव्याचा विषय: रायगडावरचा शिवदरबार)
  • तृतीय क्रमांक (₹३५,०००/-): समस्त गव्हाणे तालीम, भोसरी (देखाव्याचा विषय: ‘डरकाळी वाघाची… शिव सह्याद्रीच्या छाव्याची!’)
  • चौथा क्रमांक (₹३०,०००/-): छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, पिंपळे गुरव (देखाव्याचा विषय: महादेव भक्त अघोरी)
  • पाचवा क्रमांक (₹२५,०००/-): समता मित्र मंडळ, काळभोर नगर, आकुर्डी (देखाव्याचा विषय: ‘ऑपरेशन सिंदूर’)
७ मंडळांना मानाचा ‘जय गणेश भूषण’ पुरस्कार!
गणेशोत्सवात उत्कृष्ट नियोजन आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील ७ प्रमुख गणेश मंडळांना मानाचा ‘जय गणेश भूषण पुरस्कार’ (विशेष सन्मानचिन्ह) प्रदान करण्यात आला:
१. जय बजरंग तरुण मंडळ, पवळे उड्डाण पूल, निगडी
२. जय हिंद मित्र मंडळ ट्रस्ट, प्राधिकरण, निगडी
३. लांडगे लिंबाची तालीम मंडळ, भोसरी गावठाण
४. पठारे लांडगे तालीम मित्र मंडळ, भोसरी
५. गांधी पेठ तालीम मित्र मंडळ, चिंचवड
६. एस. के. एफ. मित्र मंडळ, चिंचवड
७. राष्ट्रतेज तरुण मंडळ, काळभोर नगर
प्रभागनिहाय मुख्य जिवंत देखावे (प्रथम क्रमांक विजेते – ₹२०,०००/-):
  • प्रभाग ‘अ’: शिवशक्ती मित्र मंडळ, आकुर्डी (विषय: स्त्री शक्तीचा करा हो सन्मान)
  • प्रभाग ‘ब’: आदर्श तरुण मंडळ, लांडे नगर, चिंचवड (विषय: नृसिंह अवतार)
  • प्रभाग ‘क’: नव महाराष्ट्र मित्र मंडळ, लांडेवाडी (विषय: वाघाचा वाघ कोंडाजी फर्जद)
  • प्रभाग ‘ड’: भैरवनाथ तरुण मित्र मंडळ, पिंपळे गुरव (विषय: गुन्हेगारी एक भयानक अंत)
  • प्रभाग ‘ई’: श्री साईनाथ तरुण मंडळ, मोहन नगर, टेल्को (विषय: डरकाळी वाघाची आग्याच्या थराराची)
  • प्रभाग ‘फ’: अमरदीप तरुण मित्र मंडळ, पिंपरी (विषय: मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो)
  • प्रभाग ‘ग’: जय बजरंग मित्र मंडळ, आहेरवाडी (विषय: शिवरायांची आग्र्यातून सुटका)
  • प्रभाग ‘ह’: शितोळे नगर क्रीडा मंडळ, सांगवी (विषय: संजीवनी वनस्पती)
सामाजिक प्रबोधन व पर्यावरणपूरक देखावे (प्रथम क्रमांक विजेते – ₹१०,०००/-):
  • प्रभाग ‘अ’: श्रीकृष्णकांती मित्र मंडळ, आकुर्डी (स्त्री: काल, आज आणि उद्या)
  • प्रभाग ‘ब’: ज्ञानदीप मित्र मंडळ, माळी आळी, चिंचवड (माय मराठीचा गंध)
  • प्रभाग ‘क’: लोंढे तालीम मित्र मंडळ, भोसरी (शेती आणि माती – विकायची नाय राखायची)
  • प्रभाग ‘ड’: मोरया तिरंगा मित्र मंडळ, काळेवाडी (पर्यावरणपूरक देखावा)
  • प्रभाग ‘ई’: माय सेवा प्रतिष्ठान, रुपीनगर (रायगड किल्ल्याची भौगोलिक माहिती)
  • प्रभाग ‘फ’: ज्योती मित्र मंडळ, पिंपरी (गड किल्ले संवर्धन)
  • प्रभाग ‘ग’: सौजन्य ग्रुप सोशल वेल्फेअर ट्रस्ट, सांगवी (सामाजिक प्रबोधन)
  • प्रभाग ‘ह’: संत नगर मित्र मंडळ, मोशी (वसुंधरेला प्रदूषणाचा विळखा)
स्थिर व हलता देखावा विभाग (प्रथम क्रमांक विजेते – ₹१०,०००/-):
तरुण मित्र मंडळ (आकुर्डी), अखिल मित्र मंडळ (चिंचवड), अष्टविनायक मित्र मंडळ (संत तुकाराम नगर), जय महाराष्ट्र मित्र मंडळ (पिंपळे सौदागर), न्यू स्टार स्पोर्ट्स फाउंडेशन (चिखली), सडना मित्र मंडळ (पिंपरी), राही माई प्रतिष्ठान (सांगवी) आणि जाणता राजा ग्रुप (कासारवाडी).

धार्मिक व पौराणिक देखाव्यांमध्ये शरयू नगर प्रतिष्ठान (प्राधिकर), भोजेश्वर मित्र मंडळ (भोसरी), श्री हनुमान व्यायाम मंडळ (टाळगाव चिखली) आणि सुभाष मित्र मंडळ (जाधव वाडी) यांनी आपापल्या प्रभागात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच भालेकर तळवडे, विठ्ठलवाडी आकुर्डी, पिंपळे निलख व नवी सांगवी येथील ८ मंडळांना उत्कृष्ट विद्युत रोषणाईसाठी प्रत्येकी ₹५,००० चे पारितोषिक देण्यात आले. याशिवाय २० मंडळांना जिवंत देखाव्यांसाठी प्रत्येकी ₹१०,००० चे बक्षीस आणि ६ महोत्सवी वर्षांच्या मंडळांना विशेष प्रोत्साहनपर पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षण डॉ. संतोष ढोरे, प्रफुल्ल तोरसे, रामदास चिंचवडे, डॉ. जितेंद्र वडशिंगकर, महेश कोळपकर, मनोज वाखारे, संजय हुलजुते, रमेश खडबडे, बाळकृष्ण मोझर, नितीन खोडदे आणि डॉ. दत्तात्रय फटांगडे यांनी केले. तर विलास कामठे, बापूसाहेब ढमाले, कैलास भांबुर्डेकर, राजाभाऊ गोलांडे, जगदीश शेट्टी, दत्तात्रय भोंडवे, अनिल वाघेरे, दिलीप माळीश्रीकांत ताकवले यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
या पत्रकार परिषदेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, तसेच विश्वस्त कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे आणि उत्तमराव गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. संतोष ढोरे यांनी प्रास्ताविक व आभार मानले, तर महेश सूर्यवंशी यांनी ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमांची आणि स्पर्धेची सविस्तर माहिती दिली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!