news
चऱ्होलीतील मनपा शाळेत चिमुकल्यांचा मनमोहक ‘योगोत्सव’; रंजक खेळांतून बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे!मनपा मुख्यालयासमोरच मृत्यूचा सापळा! मुंबई-पुणे हायवेवरील तुटलेल्या ड्रेनेज चेंबरवरून प्रदीप गायकवाड कडाडलेपिंपरी-चिंचवड मनपाच्या ५ हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा! ग्रॅच्युइटी आणि बोनससाठी यशवंतभाऊ भोसले यांचे ‘एस्क्रो अकाऊंट’ मॉडेल यशस्वी६ खासदारांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! उद्धव ठाकरेंचे भावनिक आवाहन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘पिक्चर अभी बाकी’चा सज्जड इशारापिंपरी-चिंचवडचे भूषण: अंकुश जाधव यांना राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ घोषित!
Home पिंपरी चिंचवड सत्तेची ऊब की कायद्याची पायमल्ली? चिंचवडमध्ये महिला अधिकाऱ्याला दालनात घुसून शिवीगाळ; पोलिसांत धाव

सत्तेची ऊब की कायद्याची पायमल्ली? चिंचवडमध्ये महिला अधिकाऱ्याला दालनात घुसून शिवीगाळ; पोलिसांत धाव

भाजप पदाधिकारी पोपट हजारे यांच्या संस्थेचा ठेका मिळवण्यासाठी दादागिरी; महापालिका वर्तुळात अस्वस्थता, पोलीस काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी महापालिकेत महिला अधिकाऱ्याला धमकी! भाजप पदाधिकाऱ्याची दादागिरी; ठेका मंजुरीसाठी दबाव टाकल्याने प्रशासनात खळबळ


पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, ९ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सत्तेची ऊब मिळताच काही पदाधिकाऱ्यांनी थेट प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करत दादागिरी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ठराविक संस्थेला ठेका मिळवून देण्यासाठी नियम बदलण्याचा दबाव टाकत महिला उपआयुक्तांना धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्याने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर आणि महापौर पद विराजमान झाल्यानंतर ही घटना घडली. भाजपचे शहर उपाध्यक्ष पोपट हजारे यांच्या संस्थेला संबंधित ठेका मिळावा, यासाठी एका पक्ष पदाधिकाऱ्याने महिला उपआयुक्तांच्या दालनात जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे. महिला अधिकाऱ्याने नियमानुसार कामाची माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित पदाधिकाऱ्याने “माझ्या सांगण्याप्रमाणे नियम बदला, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पदाधिकाऱ्याने केवळ धमकीच दिली नाही, तर दालनात मोठ्या आवाजात ओरडत शिवीगाळ केल्याचेही प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात आहे. या प्रकारामुळे महिला अधिकारी प्रचंड मानसिक तणावाखाली असून, महापालिकेतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही या दादागिरीमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. सत्तेच्या बळावर अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपकडून या घटनेवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावर बोलताना भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की, “आम्ही दोन्ही बाजूंची माहिती घेत आहोत, सत्यता पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल.”

पुन्हा सत्ता मिळताच अशा प्रकारे पदाधिकाऱ्यांनी कायद्याचा धाक न बाळगता थेट क्लास-वन महिला अधिकाऱ्याला धमकी देणे, हे लोकशाही आणि प्रशासकीय शिस्तीसाठी घातक मानले जात आहे. पोलीस आता या प्रकरणी पोपट हजारे आणि संबंधित पदाधिकाऱ्यावर काय पाऊल उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!