news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या! सराईत गुन्हेगार संतोष घारे पोलिसांच्या जाळ्यात

दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या! सराईत गुन्हेगार संतोष घारे पोलिसांच्या जाळ्यात

कामशेतमधून आरोपीला घेतलं ताब्यात; ११ चोरीच्या गाड्या हस्तगत करण्यात यश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संत तुकारामनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ११ मोटारसायकलसह सराईत चोरट्यास अटक, ५.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: ३१ मार्च २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गजाआड करण्यात संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मोठे यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चोरीच्या एकूण ११ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५,९५,००० रुपये इतकी आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कडक सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला होता.

या तपासादरम्यान, पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी संतोष शिवराम घारे (वय ४४, रा. ओझर्डे, ता. मावळ) याला कामशेत येथून ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संतोषची कसून चौकशी केली असता, त्याने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर हद्दीतून ११ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून विविध ब्रँडच्या ११ गाड्या हस्तगत केल्या आहेत, ज्यामध्ये स्प्लेंडर प्लस, स्प्लेंडर प्रो, ॲक्टिव्हा आणि हिरो पॅशन प्रो यांसारख्या वाहनांचा समावेश आहे. या कारवाईमुळे खालील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत:

  • संतुकरामनगर पोलीस ठाणे: ४ गुन्हे

  • म्हाळुंगे एमआयडीसी: २ गुन्हे

  • सहकारनगर: १ गुन्हा

  • आळंदी: १ गुन्हा

  • सांगवी: १ गुन्हा

  • तळेगाव एमआयडीसी: २ गुन्हे

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाडबसवराज तेली, पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील, तसेच पोलीस अंमलदार दत्तू पाटेकर, अनिल मोहिते, ज्ञानेश्वर भुरे, भागवत गायकवाड, विठ्ठल भारमळ, जावेद मुजावर, संतोष राजपूत आणि सुनील धावारे यांचा समावेश होता.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!