news
Home पिंपरी चिंचवड पोलीस दलातील शिलेदारांचा सन्मान! पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात सेवानिवृत्त अंमलदारांचा गौरव

पोलीस दलातील शिलेदारांचा सन्मान! पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात सेवानिवृत्त अंमलदारांचा गौरव

सह आयुक्त शशिकांत महावरकर यांच्या हस्ते सत्कार; पुढील प्रवासासाठी दिल्या शुभेच्छा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ३ पोलीस अंमलदार सेवामिवृत्त; ‘शिवनेरी हॉल’मध्ये शानदार निरोप समारंभ

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक: ३१ मार्च २०२६,मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील ३ पोलीस अंमलदार आज, ३१ मार्च २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या पोलीस अंमलदारांचा सत्कार आणि निरोप समारंभ पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ येथे दुपारी १२:०० वाजता अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.

सेवामिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार:
अ.क्र. नाव हुद्दा व नेमणूक
१. श्री. अशोक विनायक पवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन)
२. श्री. राजू तानाजी चौधरी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (पोलीस मुख्यालय)
३. श्री. शिवाजी बापूराव गोरे पोलीस शिपाई (ब.नं. ३२३१, पोलीस मुख्यालय)

या आयोजित कार्यक्रमात पोलीस सह आयुक्त श्री. शशिकांत महावरकर आणि पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) श्री. गणेश इंगळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त अंमलदारांचा सत्कार करण्यात आला. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्ह, भेटवस्तू आणि झाडाचे रोपटे देऊन गौरविण्यात आले. उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अंमलदारांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या निरोप समारंभास वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने श्री. शशिकांत महावरकर (पोलीस सह आयुक्त), श्री. गणेश इंगळे (पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय), श्री. राकेश भामरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), श्री. संजय नरावडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कल्याण शाखा) उपस्थित होते.

यावेळी पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी वृंद तसेच सेवानिवृत्त झालेल्या अंमलदारांचे नातेवाईक उपस्थित होते. आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव मान्यवरांनी आपल्या भाषणातून केला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!