news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड रहाटणीत महापालिकेचा ‘बुलडोझर’! ८८ चौरस मीटरचे अवैध बांधकाम हटवले

रहाटणीत महापालिकेचा ‘बुलडोझर’! ८८ चौरस मीटरचे अवैध बांधकाम हटवले

आयुक्तांच्या आदेशानंतर अतिक्रमण विरोधी पथक ॲक्शन मोडमध्ये; नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनधिकृत बांधकामांवर हातोडा; रहाटणीतील ८८.८७ चौरस मीटरचे अतिक्रमण जमीनदोस्त

 

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दिनांक: १ एप्रिल २०२६,मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाने अनधिकृत बांधकामांविरुद्ध आपली मोहीम तीव्र केली आहे. आज प्रभाग क्र. २७ मधील रहाटणी परिसरातील वृंदावन कॉलनी आणि तापकीर नगर येथे धडक कारवाई करत सुमारे ८८.८७ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रहाटणीतील तापकीर मळा चौक आणि आसपासच्या परिसरात विनापरवाना उभारण्यात आलेल्या बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने सकाळीच धडक दिली.

या मोहिमेसाठी खालील यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा वापर करण्यात आला:

  • यंत्रसामग्री: १ जेसीबी ब्रेकर, १ ट्रॅक्टर ब्रेकर आणि ४ हातोडे.

  • मनुष्यबळ: एम.एस.एफ.चे १२ जवान, १ पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे एकूण ९ मजूर.

‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली उप अभियंता जयवंत रोकडे यांनी या कारवाईचे समन्वय साधले. या मोहिमेत बीट निरीक्षक किरण पवार, विनोद बजबळकर, दिग्विजय घोटकुले आणि ज्ञानराज खंडाळे यांच्या पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला.

शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासन इथून पुढेही अशाच प्रकारची कठोर भूमिका घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. “नागरिकांनी कोणतेही बांधकाम करताना महापालिकेच्या नियमांचे पालन करावे आणि रीतसर परवानगी घ्यावी, अन्यथा अशाच प्रकारे निष्कासनाची कारवाई केली जाईल,” असे आवाहन ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!