news
लुटियन्स दिल्लीतील ‘उच्चभ्रूंचा’ अड्डा बंद! साम्राज्यवादी मानसिकतेच्या ‘दिल्ली जिमखाना क्लब’वर मोदी सरकारचा हातोडाप्रशासनाचा पाठीचा कणा असलेल्या महसूल यंत्रणेला अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे कडक ताकीद! आठवड्यातून एक दिवस गावपातळीवर तपासणी बंधनकारकपिंपरी-चिंचवड शहर १५ दिवस हाय अलर्टवर! पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकरांकडून जमावबंदीचे कडक आदेश जारी“सरकार भांडवलदारांच्या भूमिकेत, कामगारांना एकत्र येणे अनिवार्य!” चिंचवडमधील भव्य चर्चासत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांचे कडक प्रतिपादन‘एआय फॉर सायन्स’च्या नव्या सुवर्णयुगाची नांदी! जगप्रसिद्ध ‘डॅडलस’ नियतकालिकात ३३ जागतिक वैज्ञानिकांचे मोठे विचारमंथन
Home अकोला अमरावतीत ‘फुगे गँग’ सक्रिय? टवाळखोरांच्या कृत्यामुळे पादचारी घाबरले

अमरावतीत ‘फुगे गँग’ सक्रिय? टवाळखोरांच्या कृत्यामुळे पादचारी घाबरले

रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांवर घाण पाण्याचे फुगे फेकून टवाळखोरांचा धुमाकूळ; दस्तूर नगर ते यशोदा नगर मार्गावर घटना | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शहरात दुचाकीवरून येऊन पाण्याचे फुगे मारणाऱ्या टवाळखोरांचा उच्छाद; नागरिकांमध्ये संताप

 

 

 

अमरावती, प्रतिनिधी विलास सावळे,  दिनांक: ७ एप्रिल २०२६, मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: शहरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार वाढले असून, दुचाकीवरून येऊन दुर्गंधीयुक्त पाण्याचे फुगे मारणाऱ्या टवाळखोरांनी उच्छाद मांडला आहे. ३ एप्रिल रोजी रात्री ११:३० च्या सुमारास दस्तूर नगर ते यशोदा नगर मार्गावर एका नागरिकाला अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिक रात्री साडेअकराच्या सुमारास दस्तूर नगरकडून यशोदा नगरकडे पायी जात असताना, मागून भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीवरील मुलांनी त्यांच्या पाठीवर घाण आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा फुगा जोरात मारला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे तो नागरिक खाली पडता-पडता वाचला. स्वतःला सावरून त्या घाबरलेल्या नागरिकाने अन्य एका दुचाकीस्वाराची मदत घेऊन टवाळखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

हे टवाळखोर किरण नगर येथील खंडेलवाल सिमेंट दुकानासमोरून जलाराम नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वेगाने पळाले. त्यानंतर त्यांनी आपली गाडी फरशी स्टॉपकडे वळवली आणि तेथून हरिगंगा मिल रस्त्याच्या दिशेने प्रसार झाले. या टवाळखोरांनी पळ काढण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर केल्याचे दिसून आले.

या संपूर्ण घटनेचा आणि टवाळखोरांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. दस्तूर नगर चौकातील ATM, नामांकित दुचाकी शोरूम आणि फरशी स्टॉप चौकातील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास या टवाळखोरांची ओळख पटण्यास मोठी मदत होऊ शकते.

अशा प्रकारे चालत्या व्यक्तीवर फुगे मारल्यामुळे पादचाऱ्यांचा तोल जाऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या नागरिकांच्या मनात या प्रकारामुळे भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी गस्त वाढवून अशा टवाळखोरांना कायद्याचा धाक दाखवावा आणि त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!