भारतीय डाक विभागात विमा एजंट पदासाठी भरती; २१ एप्रिल रोजी अमरावतीत मुलाखती
अमरावती, ९ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली:
अमरावती: भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यासाठी विमा एजंट पदाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
-
वय: मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे.
-
शिक्षण: उमेदवार किमान इयत्ता दहावी (SSC) किंवा बोर्डाची समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
-
निवड प्रक्रिया: उमेदवाराचे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य आणि जीवन विम्याबाबतचे ज्ञान या आधारावर मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
निवड झालेल्या उमेदवारास ५ हजार रुपयांची अनामत रक्कम (Security Deposit) NSC किंवा KVP च्या स्वरूपात जमा करावी लागेल. ही नियुक्ती पूर्णपणे कमिशन तत्त्वावर असेल. सुरुवातीला तात्पुरता परवाना दिला जाईल, जो नियुक्तीनंतर ३ वर्षांच्या आत IRDA ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कायमस्वरूपी केला जाईल.
इच्छुक उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह उपस्थित राहावे:
-
कागदपत्रे: १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो.
-
दिनांक: २१ एप्रिल २०२६
-
वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत
-
स्थळ: ‘प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प, अमरावती – ४४४६०२’
अमरावती विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या भरती प्रक्रियेची माहिती दिली असून जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

