news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home अकोला अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’ने तस्करांचे धाबे दणाणले! मच्छी मार्केट परिसरातून ७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’ने तस्करांचे धाबे दणाणले! मच्छी मार्केट परिसरातून ७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक स्वतः उतरले मैदानात; पहाटे कत्तलखाना परिसरात छापा टाकून ३२ जनावरांची केली सुटका | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अकोला पोलीस अधीक्षकांचा गोवंश तस्करांवर ‘प्रहार’; ३२ गोवंशांना जीवदान, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

 

अकोला प्रतिनिधी विलास सावळे, १२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अकोला: अकोला शहरात अवैधरित्या गोवंशाची तस्करी आणि कत्तल करणाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः मैदानात उतरून ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मच्छी मार्केट कत्तलखाना परिसरात भल्या पहाटे टाकलेल्या छाप्यात ३२ गोवंशांची सुटका करण्यात आली असून, एकूण १३ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अकोल्यातील गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

रामदास पेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर गोवंश कत्तलीसाठी आणले जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी स्वतः या मोहिमेचे नेतृत्व केले. अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके, रामदास पेठचे ठाणेदार शिरीष खंडारे आणि आरसीपी पथकाची वेगवेगळी पथके तयार करून पहाटेच्या सुमारास संशयित ठिकाणांवर धडक देण्यात आली.

या कारवाईत कत्तलखाना परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून गाय, गोऱ्हे आणि कालवड अशा एकूण ३२ गोवंशांची सुटका करण्यात आली. तस्करांनी या जनावरांना अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवले होते. सुटका केलेल्या सर्व जनावरांना पुढील उपचार, देखरेख आणि संगोपनासाठी आदर्श गौसेवा संस्था, म्हैसपूर (अकोला) येथे सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.

ज्यांच्या घरातून किंवा ताब्यातील जागेतून गोवंश जप्त करण्यात आला आहे, अशा सात जणांवर रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाईतील आरोपी आणि जप्त माल:

१) अब्दुल रहीम कुरेशी: ०५ गोवंश (किंमत २,३६,०००/-)

२) जावेद खान कुरेशी: ०५ गोवंश (किंमत २,७०,०००/-)

३) मोहम्मद मोसीन अब्दुल नजीर: ०५ गोवंश (किंमत २,१५,०००/-)

४) फिरोज कुरेशी शेख फकीरा: ०२ गोवंश (किंमत १,०५,०००/-)

५) शहजाद कुरेशी उर्फ सज्जू: ०५ गोवंश (किंमत १,७४,०००/-)

६) शेख फैयाज शेख महेबुब: ०५ गोवंश (किंमत २,१५,०००/-)

७) शेख मोबीन शेख मुनताज: ०५ गोवंश (किंमत १,६२,०००/-)

एकूण जप्त गोवंश: ३२ (किंमत १३,७७,०००/- रुपये)

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः या कारवाईत सहभागी होऊन तस्करांना स्पष्ट इशारा दिला आहे की, अकोला जिल्ह्यात यापुढे कत्तलीसाठी गोवंश तस्करी करणाऱ्यांविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार अत्यंत कठोर कारवाई केली जाईल.

ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन पाटील, शंकर शेळके, शिरीष खंडारे, सपोनि विजय चव्हाण, उपनिरीक्षक गोपाल जाधव, माजीद पठाण, विष्णू बोडखे व एलसीबी आणि रामदास पेठ पोलीस पथकाने फत्ते केली.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!