news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची खैर नाही! महापौरांचा किवळे परिसरात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ७ दिवसांत सर्वेक्षणाचे आदेश

नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची खैर नाही! महापौरांचा किवळे परिसरात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ७ दिवसांत सर्वेक्षणाचे आदेश

किवळे परिसरात महापौरांची प्रत्यक्ष पाहणी; एसटीपी सक्ती, दंडात्मक कारवाई आणि जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नाल्यांद्वारे नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर तात्काळ व कडक कारवाई करा – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , २२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “नाल्यांद्वारे थेट सांडपाणी नदीत सोडणे हा केवळ नियमांचा भंग नसून तो एक गंभीर पर्यावरणीय गुन्हा आहे. या प्रकरणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी सांडपाणी सोडणाऱ्यांवर तातडीने आणि कडक कायदेशीर कारवाई करा,” असे स्पष्ट निर्देश महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिले.

किवळे परिसरातील सिम्बॉयसिस कॉलेज आणि आसपासच्या गृहनिर्माण सोसायट्यांमधून थेट पवना नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आज प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

महापौरांचे ७ कलमी ‘ॲक्शन प्लॅन’ व निर्देश:

१. तात्काळ सर्वेक्षण: किवळे परिसरातील सर्व सोसायट्यांचे ७ दिवसांत सर्वेक्षण करून सांडपाणी नाल्यात सोडणाऱ्यांची यादी तयार करावी.

२. STP सक्ती: सोसायट्यांमधील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) त्वरित कार्यान्वित करावेत, अन्यथा दंडात्मक कारवाई करावी.

३. बेकायदेशीर जोडण्या तोडणे: नाल्यांद्वारे नदीत जाणाऱ्या सर्व बेकायदेशीर सांडपाणी वाहिन्या तात्काळ बंद कराव्यात.

४. कायदेशीर गुन्हे: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर दंड आकारून आवश्यकतेनुसार गुन्हे दाखल करावेत.

५. पाण्याचा पुनर्वापर: प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर बागेसाठी आणि फ्लशिंगसाठी करणे अनिवार्य करावे.

६. अधिकारी जबाबदार: संबंधित क्षेत्रातील अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, दुर्लक्ष झाल्यास त्यांच्यावरही प्रशासकीय कारवाई होणार.

७. नियमित मॉनिटरिंग: दर आठवड्याला कामाचा प्रगती अहवाल सादर करणे बंधनकारक असेल.

महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले की, ही कारवाई केवळ किवळेपुरती मर्यादित न राहता संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात राबविली जाईल. शहरातील तिन्ही नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.

यावेळी महापौरांनी ‘सांडपाणी मुक्त नदी’ या अभियानाचा उल्लेख केला. “नदी स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी प्रदूषणाबाबत प्रशासनाला माहिती द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.

या पाहणी दौऱ्यात नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, माजी नगरसदस्य तुकाराम भोंडवे, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट, उपअभियंता दीपक करपे, कनिष्ठ अभियंता प्रसाद संकपाळ आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!