news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड पिंपळे सौदागरचा मुख्य रस्ता होणार ‘स्मार्ट’! शत्रुघ्न (बापू) काटेंनी घेतला काँक्रिटीकरणाचा आढावा

पिंपळे सौदागरचा मुख्य रस्ता होणार ‘स्मार्ट’! शत्रुघ्न (बापू) काटेंनी घेतला काँक्रिटीकरणाचा आढावा

"नागरिकांची सोय आणि कामाचा दर्जा, यात कोणतीही तडजोड नको!"; रस्ता काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कुणाल आयकॉन रोडचा कायापालट; शत्रुघ्न (बापू) काटेंकडून प्रत्यक्ष पाहणी आणि कामाच्या दर्जाचा आढावा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपळे सौदागर: पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि खड्डेमुक्त व्हावी, यासाठी कुणाल आयकॉन रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. भाजप शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या कामाची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि कामाच्या गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेतला.

कुणाल आयकॉन रोड हा पिंपळे सौदागरमधील महत्त्वाचा आणि रहदारीचा रस्ता मानला जातो. या रस्त्याच्या नूतनीकरणामुळे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.

पाहणी दरम्यान श्री बापू काटे यांनी कामाची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर दिला. “नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र, हे काम करत असताना स्थानिक रहिवाशांना आणि वाहनचालकांना कोणताही नाहक त्रास होणार नाही, याची प्रशासनाने पूर्ण काळजी घ्यावी,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, प्रकल्प विभागाच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम नियोजनबद्ध पद्धतीने आणि दर्जेदार साहित्याचा वापर करून वेळेत पूर्ण करण्याबाबतही त्यांनी बजावले.

या पाहणी दौऱ्यावेळी महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये विद्युत विभाग उपअभियंता दीपाली धेंडे, प्रकल्प विभाग उपअभियंता चंद्रकांत मोरे, विद्युत विभाग कनिष्ठ अभियंता गिरीधर कोरे, पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता अंकुश सयाजीराव तसेच संबंधित कामाचे कंत्राटदार उपस्थित होते.

“सुरक्षित वाहतूक आणि नागरिकांचे समाधान हीच आमची प्राथमिकता आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यावर परिसरातील रहिवाशांच्या प्रवासाचा दर्जा सुधारेल आणि भविष्यातील देखभालीचा खर्चही कमी होईल,” असा विश्वास श्री शत्रुघ्न काटे यांनी यावेळी व्यक्त केला.

या कामामुळे परिसरातील सौंदर्यात भर पडणार असून, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांपासून नागरिकांना कायमची सुटका मिळणार आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!