news
Home पिंपरी चिंचवड प्रशासकीय कामांना मिळणार गती! आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे महापालिकेत बदल्यांचे आदेश

प्रशासकीय कामांना मिळणार गती! आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे महापालिकेत बदल्यांचे आदेश

परशुराम वाघमोडे 'इ' क्षेत्रीय अधिकारी, तर तानाजी नरळे यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाचा पदभार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय फेरबदल; उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २२ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत. यामध्ये उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त कार्यभाराची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासोबतच काही सहाय्यक आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने या संदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

  • उपायुक्त संदीप खोत: सध्या ते पशुवैद्यकीय व कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार (पशुवैद्यकीय विभागासह) देण्यात आला आहे.

  • सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे: उपायुक्त खोत यांच्याकडील कामगार कल्याण विभागाची जबाबदारी आता तानाजी नरळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय, परशुराम वाघमोडे यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन आणि अभिलेख कक्षाचा पदभारही नरळे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

  • सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे: तानाजी नरळे यांच्याकडील ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचा (भोसरी परिसर) क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार आता परशुराम वाघमोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी अनुभवी उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे दिल्याने प्रशासकीय कामांना वेग मिळण्याची शक्यता आहे. तसेच, क्षेत्रीय स्तरावर आणि आपत्ती व्यवस्थापन विभागात करण्यात आलेल्या या बदलांमुळे नागरी सुविधा आणि आपत्कालीन कामकाजात अधिक सुसूत्रता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नवीन पदभार स्वीकारल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!