news
दिल्ली मतदार यादी पुनरीक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; बाधित मतदारांची नावे आणि कारणे सार्वजनिक करण्याचे आवाहन!‘नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समिती बैठकीत सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!‘शिक्षकांमुळेच महापालिका शाळांकडे पालकांचा कल वाढला’; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान!‘शहराच्या नियोजनबद्ध विकासात पालिकेच्या अभियंत्यांचे योगदान अद्वितीय’; महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चौकात घुमणार माता रमाईंच्या त्यागाचा महिमा! भव्य स्मारकाच्या कामाला स्थायी समितीची ग्रीन सिग्नल

पिंपरी चौकात घुमणार माता रमाईंच्या त्यागाचा महिमा! भव्य स्मारकाच्या कामाला स्थायी समितीची ग्रीन सिग्नल

पिंपरीत साकारणार माता रमाईंचे भव्य स्मारक; स्थायी समितीकडून स्थापत्य कामांना मंजुरी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

त्यागमूर्ती माता रमाईंचे स्मारक हे पिंपरी-चिंचवडकरांसाठी सामाजिक जाणिवेचा वारसा – अभिषेक बारणे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, २३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात भर टाकणारा आणि सामाजिक कृतज्ञतेची साक्ष देणारा एक ऐतिहासिक निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. शहराच्या मध्यवर्ती पिंपरी चौकात उभारण्यात येणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या भव्य स्मारकाच्या स्थापत्य विषयक कामांना स्थायी समितीने आज अधिकृत मंजुरी दिली. या निर्णयामुळे नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

महापालिका मुख्यालयातील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माता रमाई या असीम त्याग, संघर्ष आणि ममतेचे प्रतीक आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यात त्यांनी दिलेली खंबीर साथ आणि वंचित घटकांसाठी केलेले योगदान प्रेरणादायी आहे. पिंपरी चौकासारख्या मध्यवर्ती ठिकाणी हे स्मारक उभे राहत असल्याने, ते येणाऱ्या पिढ्यांसाठी एक विचारांचे ऊर्जा केंद्र ठरेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

स्थायी समितीच्या या मंजुरीमुळे आता स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासोबतच सामाजिक वारसा जपण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले आहे. या निर्णयाचे शहरातील विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.


“माता रमाईंचे स्मारक हे पिंपरी-चिंचवडकरांसाठी केवळ एक प्रकल्प नसून तो आपल्या सामाजिक जाणिवेचा वारसा आहे. त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. हे स्मारक समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देणारे ठरेल. या कामाचा दर्जा उत्तम राखून ते वेळेत पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य असेल.”

– अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!