news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड उपमहापौर शर्मिला बाबर यांचा जिजामाता रुग्णालयात ‘सरप्राईज व्हिजिट’! आरोग्य यंत्रणेचा घेतला झाडाझडती

उपमहापौर शर्मिला बाबर यांचा जिजामाता रुग्णालयात ‘सरप्राईज व्हिजिट’! आरोग्य यंत्रणेचा घेतला झाडाझडती

रुग्णांशी साधला थेट संवाद; औषध तुटवडा आणि अस्वच्छता खपवून घेणार नसल्याचा प्रशासनाला इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जिजामाता रुग्णालयातील आरोग्य सेवांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांनी घेतला सविस्तर आढावा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयास उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भेट देऊन रुग्णालयातील विविध आरोग्य सेवांचा सखोल आढावा घेतला. रुग्णालयातील स्वच्छता, औषधसाठा, डॉक्टर व परिचारिका यांची उपलब्धता तसेच उपचार प्रक्रियेची कार्यक्षमता याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करून प्रकृतीविषयी माहिती घेतली. उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या कडक सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

रुग्णालयातील सेवा अधिक गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यावर उपमहापौरांनी भर दिला. रुग्णालयातील औषधांची उपलब्धता आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तत्परता याकडे संबंधित विभागाने विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, “पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. जिजामाता रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले पाहिजेत, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी. नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आरोग्य सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करणे आवश्यक असून, त्यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे.”

या भेटीमुळे रुग्णालयीन प्रशासनाची यंत्रणा सतर्क झाली असून, येणाऱ्या काळात जिजामाता रुग्णालयातील सुविधांमध्ये अधिक सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!