news
रहाटणीत नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांची धडक कारवाई! गजानन नगरमधील ‘डेथ ट्रॅप’ ठरणारी ड्रेनेज समस्या २४ तासांत केली गुलपिंपरी-चिंचवडमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक करणारे आहेरकर कुटुंब नेवासामधून अटक! आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईजागतिक बाजारात सोने गडगडले! स्पॉट गोल्ड ४,१६९ डॉलरवर; अमेरिकन व्याजदर आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेतभारतातील म्युझिक इंडस्ट्रीला केंद्र सरकारचे मोठे गिफ्ट; ‘PPL India’ ला मिळाली अधिकृत कॉपीराईट सोसायटी म्हणून मान्यता!मोरवाडीत पिंपरी-चिंचवड भाजपचा भव्य नियुक्ती सोहळा; भुजबळ, नेमाने, भालेराव, मोरे आणि शिर्के यांच्यावर नव्या आघाड्यांची जबाबदारी!
Home पिंपरी चिंचवड कुंचीकोरवी समाजाची कुलस्वामिनी मरीमाता देवीचा यात्रोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा!

कुंचीकोरवी समाजाची कुलस्वामिनी मरीमाता देवीचा यात्रोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा!

विविध राज्यांतून ५ हजारांहून अधिक भाविक दाखल; अग्नी प्रवेश आणि पारंपारिक विधींनी वेधले लक्ष | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

देहूरोड येथे मरीमाता देवीचा उत्सव उत्साहात संपन्न; कुंचीकोरवी समाजबांधवांची मोठी उपस्थिती

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

देहूरोड: भटके विमुक्त जाती जमातीतील कैकाडी समाजाची उपजात असलेल्या कुंचीकोरवी समाजाची कुलस्वामिनी ‘मरीमाता देवी’चा वार्षिक उत्सव पुणे जिल्ह्यातील देहूरोड (शिवाजीनगर) येथे अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. १९ एप्रिल ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांतून ५ हजारांहून अधिक भाविक सहभागी झाले होते.

देहूरोड रेल्वे स्टेशन समोरील परिसरात सुमारे ५५ ते ६० वर्षांपूर्वी मरीमाता देवी स्वयंभू प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात देवीने कुंचीकोरवी समाजातील भक्ताला दर्शन दिले, तेव्हापासून या उत्सवाचा प्रारंभ झाला. आज महाराष्ट्रातील गुजराती, राजस्थानी आणि प्रमुख कुंचीकोरवी समाजबांधव मोठ्या श्रद्धेने या देवीची सेवा करतात. दरवर्षी समाज प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचे नियोजन केले जाते.

उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली पालखी शोभायात्रा पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली. समाज प्रमुख दशरतजी ऊर्फ यलप्पा मारुती कुंचीकर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पार पडली. देवीचे पुजारी भीमाप्पा सोनप्पा कुंचीकर आणि रमेश दसप्पा कुंचीकर यांना पालखीचे मानकरी म्हणून बहुमान देण्यात आला. सगवड गावातून नदीकाठी मानपान देऊन पारंपरिक जल्लोषात ही शोभायात्रा निघाली.

यावेळी भक्तांनी नैवेद्य, साष्टांग दंडवत आणि ‘अग्नी प्रवेश’ करून आपले नवस फेडले. भटके विमुक्त समाजात प्रचलित असलेल्या प्राचीन परंपरांचे दर्शन या यात्रेनिमित्त घडले.

या उत्सवाच्या काळात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतले. यामध्ये भटके विमुक्त विकास परिषद पिंपरी चिंचवड जिल्हा संयोजक ललितजी कासार, युवा आयाम प्रमुख बाबु कोली, संपर्क प्रमुख राजुजी निकम, रामेश्वर साळुंखे आणि पुणे अंशकालीन कार्यकर्ता किशोर शिंदे यांचा समावेश होता. मान्यवरांनी देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

यात्रेच्या यशस्वीतेसाठी शिवाजीनगर देहूरोड भागातील सर्व समाजबांधव आणि माता-भगिनींनी परिश्रम घेतले. भाविकांच्या स्वागतासाठी प्रसादाचे वाटप, विविध मनोरंजनपर कार्यक्रम आणि खेळांचे आयोजनही करण्यात आले होते.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!