news
Home पिंपरी चिंचवड एम.डी. ड्रग्ज विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त! पिंपरी-चिंचवड पोलिसांची खालुंब्रेत धडक कारवाई; तिघांना बेड्या

एम.डी. ड्रग्ज विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त! पिंपरी-चिंचवड पोलिसांची खालुंब्रेत धडक कारवाई; तिघांना बेड्या

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेचा अ‍ॅक्शन प्लॅन; ११६ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; १३.८६ लाखांच्या एम.डी. ड्रग्जसह तिघांना अटक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २३ एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई केली आहे. खालुंब्रे (ता. खेड) परिसरात एम.डी. (मेफेड्रॉन) विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्याकडून सुमारे ११६.५४ ग्रॅम ड्रग्ज आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत असताना, पोलीस हवालदार विजय दौंडकर आणि निखिल वर्षे यांना एका मोपेड गाडीवरील (MH 14 CA 9937) इसमांबाबत संशय आला. २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दक्षिण म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खालुंब्रे गाव ते जोपादेवी मंदिर रोडवर भानुदास गाडे यांच्या बिल्डिंगसमोर पथकाने सापळा लावला.

यावेळी आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे ११ लाख ६५ हजार ४०० रुपये किमतीचे ११६.५४ ग्रॅम एम.डी. सापडले.

१. शिशुपाल धनाराम चौधरी (वय २५, रा. खालुंब्रे, मूळ रा. राजस्थान)

२. रामदिन भवरलाल चौधरी (वय २४, रा. खालुंब्रे, मूळ रा. राजस्थान)

३. परविण मल्लाराम चौधरी (वय २२, रा. वडगाव मावळ, पुणे – ड्रग्ज पुरवठादार)

पोलिसांनी या कारवाईत ११.६५ लाखांचे अंमली पदार्थ, ३ मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी असा एकूण १३ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) कलम ८(क), २२(क) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जासभाये पुढील तपास करत आहेत.

शहरात अंमली पदार्थांची विक्री किंवा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

  • अंमली पदार्थ विरोधी पथक: ८६००००२३२०

  • पोलीस हेल्पलाईन: ११२

  • मानस हेल्पलाईन: १९३३

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवाजी पवार आणि सहायक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस फौजदार शकूर तांबोळी, शिल्पा कांबळे, ज्ञानेश्वर मुळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!