news
पिंपरीतील ‘श्रीटिकेल’ कंपनीच्या २७५ कामगारांनी केले रक्तदान; ‘वायसीएम’ मधील गरीब रुग्णांना मिळणार जीवनदान!पिंपरी-चिंचवडमधील १३४ मनपा शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी घुमला ‘ओंकार’ नाद! आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभागपिंपरी-चिंचवड मनपा आणि योग विद्या धामच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ संकल्पनेवर भव्य योग सोहळा!रहाटणीत आंतरराष्ट्रीय योगदिनाचा उत्साह! आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराज उद्यानात सामूहिक योगसाधनापिंपरी मनपा मुख्यालयाबाहेर ‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा महाप्रभाव! ‘डेथ ट्रॅप’ ठरलेले ड्रेनेज चेंबर सुट्टीच्या दिवशी युद्धपातळीवर दुरुस्त
Home पिंपरी चिंचवड मनपाच्या ३० शिलेदारांचा सन्मानपूर्वक निरोप! सेवानिवृत्ती सोहळ्यात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी जागवल्या आठवणी

मनपाच्या ३० शिलेदारांचा सन्मानपूर्वक निरोप! सेवानिवृत्ती सोहळ्यात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी जागवल्या आठवणी

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न; कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचा गौरव | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून एप्रिल २०२६ अखेर ३० अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यरत असताना प्रामाणिकपणा व निष्ठेने दिलेल्या सेवेमुळेच संस्थेची भक्कम पायाभरणी झाली आहे, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले. महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.

माहे एप्रिल २०२६ अखेर नियत वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक कुशाग्र कदम, उत्तम केंदळे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, “सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा बजावत आपली जबाबदारी पार पाडली आहे. सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा नव्या संधींचा असल्याने त्यांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेऊन आनंदी आयुष्य जगावे”. तसेच, कुटुंबानेही या कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी “सेवानिवृत्ती ही केवळ कागदावर असते, मनाची नसते” असे नमूद करत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या अनुभवाचा लाभ नव्या पिढीला करून द्यावा, असे आवाहन केले.

  • नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त: कार्यकारी अभियंता सुनील वाघमारे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, मुख्याध्यापक जयमाला गावडे, चंदा काकडे, सिस्टर इन्चार्ज रोहिणी काकडे, मुख्य लिपिक प्रकाश बाणेकर, राजकुमार यादव, मुरगू बोटे, माया गिते, उपशिक्षक सुनीता इंगळे, फार्मासिस्ट मिलिंद पंडित, सांख्यिकी सहाय्यक प्रशांत उमराणी, वाहन चालक विलास ढोरे, रखवालदार गुलाब हिले, शिपाई विजय कदम, मजूर राजू कुटे, सुरेश देवकर, भिमाजी देवकर, सफाई कामगार पुष्पा ओव्हाळ, आणि रामलिंग गायकवाड.

  • स्वेच्छानिवृत्ती घेतलेले: कार्यकारी अभियंता राजेंद्र मोराणकर, स्टाफनर्स मंगल डफळ, मुकादम सुनील माने, प्रवीण डोळस, सफाई कामगार शाम मासरे, कांता शितोळे, मच्छिंद्र सोनवणे, सफाई सेवक महंमद कादर, तुकाराम गोफणे, आणि दीपक उबाळे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!